मुंबई - मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. पुढील महिन्यात १० सप्टेंबरला मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी सुमारे ९५ हजार मतदार मतदान करणार होते. मात्र, अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केल्याने विविध विद्यार्थी संघटनांनी व राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिनेट निवडणूक पुढे ढकलली - मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत ही गेल्यावर्षी २०२२ सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात आली होती. पुढची सिनेट नोव्हेंबर महिन्यात अस्तित्वात येणे अपेक्षित असले तरी विद्यापीठाचा कारभार प्रभारींवर अवलंबून असल्याने निवडणुका लांबल्या आहेत. परंतु या महिन्यात ९ ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित झाला. १० सप्टेंबरला मतदान होऊन मतमोजणी १३ सप्टेंबरला होणार असताना अचानक ही निवडणूक पुढे ढकलली असल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-
The Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens. pic.twitter.com/bOhzrJpXJt
">The Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2023
We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens. pic.twitter.com/bOhzrJpXJtThe Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2023
We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens. pic.twitter.com/bOhzrJpXJt
ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल - ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. गुरुवारी रात्री 11 वाजता सिनेट निवडणूक पुढे ढकलण्याचे पत्र काढण्यात आले. शंभर टक्के आमच्या बाजूने निकाल लागला असता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि नंतर स्थगित झाला. मणिपूरसारखे वातावरण येथे नाही. भांडण नाही, वाद नाही. सव्वा लाख मतदारांनी यामध्ये नाव नोंदविले आहे. मग असं काय घडलं? ही निवडणूक स्थगित का केली? कोणी बैठक घेतली? मुंबई विद्यापीठाचे अधिकारी फोन बंद करून बसलेत. कोणीही कारण सांगायला तयार नाही. मुख्यमंत्री डरपोक आहेत, त्यांचा दबाव यामध्ये आहे का? असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले.
-
मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक काल 'रातोरात' स्थगित करण्यात आली. त्याबाबत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सन्मा. श्री. रमेशजी बैस (@maha_governor) यांना मनविसे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे ह्यांनी लिहिलेले पत्र.#मुंबई_विद्यापीठ #सिनेट_निवडणूक… pic.twitter.com/aG8Wb7rlby
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक काल 'रातोरात' स्थगित करण्यात आली. त्याबाबत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सन्मा. श्री. रमेशजी बैस (@maha_governor) यांना मनविसे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे ह्यांनी लिहिलेले पत्र.#मुंबई_विद्यापीठ #सिनेट_निवडणूक… pic.twitter.com/aG8Wb7rlby
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 18, 2023मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक काल 'रातोरात' स्थगित करण्यात आली. त्याबाबत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सन्मा. श्री. रमेशजी बैस (@maha_governor) यांना मनविसे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे ह्यांनी लिहिलेले पत्र.#मुंबई_विद्यापीठ #सिनेट_निवडणूक… pic.twitter.com/aG8Wb7rlby
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 18, 2023
हरणार याच भीतीपोटी निवडणूक पुढे ढकलली - सिनेट निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत म्हणाले की, राज्यातले सरकार भीतीपोटी कुठल्याही निवडणुका घ्यायला तयार नाही. सिनेट निवडणुका रद्द झाल्याने आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. या निवडणुकीत शिवसेनेच्या युवा पॅनलचा १०० टक्के विजय होणार होता. आपण हरणार याच भीतीपोटी निवडणुका रद्द करणार आहात का? महापालिकेच्या निवडणुका याच भीतीमुळे तुम्ही घेत नाहीत. तसेच उद्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकासुद्धा तुम्ही योग्यवेळी घेणार नाहीत का? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. सरकारने दिलेल्या आदेशामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.
-
तीन पक्ष युतीत-तीन पक्ष आघाडीत तरीही सध्या विदयापिठाच्या निवडणुकीलाही घाबरायला लागले आहेत...
— Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) August 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आम्ही एकटे लढतोय... तरीही सर्वांना नडतोय... 😎#mumbaiuniversity@mnsadhikrut pic.twitter.com/cdXOxDcq6Y
">तीन पक्ष युतीत-तीन पक्ष आघाडीत तरीही सध्या विदयापिठाच्या निवडणुकीलाही घाबरायला लागले आहेत...
— Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) August 17, 2023
आम्ही एकटे लढतोय... तरीही सर्वांना नडतोय... 😎#mumbaiuniversity@mnsadhikrut pic.twitter.com/cdXOxDcq6Yतीन पक्ष युतीत-तीन पक्ष आघाडीत तरीही सध्या विदयापिठाच्या निवडणुकीलाही घाबरायला लागले आहेत...
— Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) August 17, 2023
आम्ही एकटे लढतोय... तरीही सर्वांना नडतोय... 😎#mumbaiuniversity@mnsadhikrut pic.twitter.com/cdXOxDcq6Y
जवळपास १२ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल हा आपल्याविरोधात जाऊन जनतेमध्ये सरकारच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ होईल, या भीतीने ही निवडणूक स्थगित केली आहे - ठाकरे गटाचे युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत
सरकारकडून चुकीचा पायंडा - छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. ढाले म्हणाले की, सरकारमधील पक्षांच्या युवा आघाडी तसेच विद्यार्थी संघटनांची तयारी नाही. त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये पराभव होईल हे लक्षात आले. भाजपा आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप ढाले यांनी केला. यामधून सरकार एक प्रकारे चुकीचा पायंडा पाडत असल्याचेही ते म्हणाले.
पराभवाची धास्ती की सत्तेची मस्ती - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे म्हणाले आहेत की, सिनेटच्या निवडणुकासुद्धा अचानक पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जिंकण्याची परिस्थिती निर्माण होईपर्यंत सत्ताधाऱ्यांना कोणत्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे दिसते. अजून किती दिवस हे वास्तविकतेपासून दूर जाणार आहेत. ही पराभवाची धास्ती आहे की सत्तेची मस्ती? असा प्रश्नही चित्रे यांनी विचारला आहे.
कुलगुरूंना घेराव घालू - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले म्हणाले की, सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाने जाहीर करून अचानक त्याला स्थगिती दिली, हे आश्चर्यकारक आहे. सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. मुंबई विद्यापीठावर नेमका कोणाचा दबाव आहे? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येत्या सात दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अन्यथा कुलगुरूंना घेराव घालू असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.
हेही वाचा-