ETV Bharat / state

Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मोर्चेबांधणी; ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत रंगणार

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घोषित होताच शिवसेना (ठाकरे गट), मनसे, भाजप आणि शिवसेना शिंदे गट या प्रमुख राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या 10 सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ठाकरे घराण्यातील दोन युवा नेते या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन्ही युवा नेत्यांसाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Mumbai University Senate Election
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Aug 11, 2023, 4:40 PM IST

Updated : Aug 11, 2023, 7:10 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर वर्चस्व राखलेल्या आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी आता मनसे, भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध सत्ताधारी घटक पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी होणारी महत्त्वाची निवडणूक असून मुंबईवर कोणाचे वर्चस्व राहील, हे दाखवणारी लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिले जात असल्याची प्रतिक्रिया, राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीसाठी दहा जागा आरक्षित : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. विविध पक्ष, विद्यार्थी संघटना मतदार नोंदणीसाठी आग्रही होत्या. आता निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी दहा जागा आरक्षित आहेत. यापैकी पाच खुल्या प्रवर्गासाठी तर पाच राखीव प्रवर्गासाठी आहेत. येत्या 10 सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

विद्यापीठावर कोणाचा दावा : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे वर्चस्व राहिले आहे. गेल्यावर्षी झालेल्या सिनेट निवडणुकीत दहापैकी दहा जागांवर आदित्य ठाकरे गटाला विजय मिळाला होता; मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेला सत्तेसाठी झगडावे लागणार आहे. तर शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित संघटनाही या निवडणुकीत यावेळी उतरत असल्याने चुरस वाढली आहे. अन्य छोट्या विद्यार्थी संघटनादेखील उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याने आदित्य ठाकरेंच्या युवासेनेला ही निवडणूक सोपी जाणार नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले.

ठाकरे विरुद्ध ठाकरे रिंगणात : शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युवासेने विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरेंनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे. आदित्य ठाकरेंचे पारडे सध्या तरी जड मानले जात असले तरी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेल्या अमित ठाकरेंना आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ही संधी असल्याने त्यांनीही शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असाच सामना अधिक रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Last Updated : Aug 11, 2023, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.