ETV Bharat / state

प्राध्यापकांनी व्यक्त केला कुलगुरूंविरोधात संताप; भर उन्हात केली निदर्शने

कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर प्राध्यापकांच्या सुट्टीबाबत तोडगा काढू न शकल्यामुळे प्राध्यापक संघटना बुक्टोच्यावतीने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. प्राध्यापक आंदोलन करणार असल्याची माहिती विद्यापीठाला मिळाल्यामुळे त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सुट्टीबाबत तोडगा काढू न शकल्यामुळे प्राध्यापकांनी कुलगुरूंविरोधात संताप व्यक्त केला
author img

By

Published : May 4, 2019, 10:15 AM IST

मुंबई- विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी पूर्तता करण्यास कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे चालढकलपणा करत असल्याने याविरोधात आज प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी कुलगुरूंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. उन्हाळी सुट्ट्यांवर तोडगा काढण्याऐवजी प्राध्यापकांवर पेपर तपासण्याचे काम सोपवण्यात आल्याने त्याविषयीही 'बुक्टो' या प्राध्यापक संघटनेकडून कुलगुरूंविरोधात राग व्यक्त करण्यात आला.

सुट्टीबाबत तोडगा काढू न शकल्यामुळे प्राध्यापकांनी कुलगुरूंविरोधात संताप व्यक्त केला

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये निकाल वेळेत लावण्यासाठी प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये परीक्षा आणि पेपर तपासणीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी प्राध्यापकांच्या सुट्टींबाबत तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कुलगुरु प्राध्यापकांच्या सुट्टीबाबत तोडगा काढू न शकल्यामुळे प्राध्यापक संघटना बुक्टोच्यावतीने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. प्राध्यापक आंदोलन करणार असल्याची माहिती विद्यापीठाला मिळाल्यामुळे त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये पेपर तपासणीचे काम दिल्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारी महाविद्यालये उशीराने सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्राध्यापकांना बसला असून त्या विरोधात प्राध्यापकांनी निदर्शने करत मुंबई विद्यापीठाचा परीसर घोषणांनी दणाणून सोडला.

जूनमध्ये महाविद्यालये उशिरा सूरू करण्याबाबत आग्रही- कुलगुरु पेडणेकर

विद्यापीठाकडून वारंवार होणारी परिनियमांची आणि कायद्याची मोडतोड थांबवावी तसेच प्राध्यापकांची सुट्टी परीक्षेसाठी वापरणार असाल तर तेवढे दिवस महाविद्यालय उशिरा सुरू करावे, अशी मागणी यावेळी बुक्टोच्यावतीने करण्यात आली. आंदोलनानंतर प्राध्यापकांचे शिष्ठमंडळ आणि कुलगुरु पेडणेकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये १५ ते २० मे दरम्यान अॅकेडेमिक कौंसीलची बैठक बोलावून जूनमध्ये महाविद्यालये उशिरा सूरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याची आग्रही भूमिका घेईल, असे आश्वासन कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी दिले. या आंदोलनात परीक्षेच्या कामात बाधा न आणता विविध महाविद्यालयातील १५० प्राध्यापक सहभागी झाले असल्याची माहिती बुक्टो संघटनाच्या मधु परांजपे यांनी दिली.

Intro:प्राध्यापकांनी व्यक्त केला कुलगुरूंविरोधात संताप; भर उन्हात केली निदर्शनेBody:प्राध्यापकांनी व्यक्त केला कुलगुरूंविरोधात संताप; भर उन्हात केली निदर्शने

मुंबई, ता. 4 : 

विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी पूर्तता करण्यास कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर हे चालढकलपणा करत असल्याने याविरोधात आज प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात तीव्र संताप व्यक्त केला. कुलगुरूंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडले. उन्हाळी सुट्ट्यांवर तोडगा काढण्याऐवजी प्राध्यापकांवर पेपर तपासण्याचे काम सोपवण्यात आल्याने त्याविषयीही बुक्टो या प्राध्यापक संघटनेकडून कुलगुरूंविरोधात राग व्यक्त करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये निकाल वेळेत लावण्यासाठी प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये परीक्षा आणि पेपर तपासणीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. त्याचप्रमाणे यावेळी कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी प्राध्यापकांच्या सुट्टींबाबत तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र कुलगुरु प्राध्यापकांच्या सुट्टीबाबत तोडगा काढू न शकल्यामुळे प्राध्यापक संघटना बुक्टोच्यावतीने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. प्राध्यापक आंदोलन करणार असल्याची माहिती विद्यापीठाला मिळाली असल्यामुुळे त्याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आले होते. 

प्राध्यापकांना उन्हाळी सुट्टीमध्ये पेपर तपासणीचे काम दिल्यामुळे सुट्टयांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारी महाविद्यालयाने उशीराने सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका प्राध्यापकांना बसला असून त्या विरोधात प्राध्यापकांनी निदर्शने करत मुंबई विद्यापीठाचे परीसर घोषणांनी दणाणून सोडला.

विद्यापीठाकडून वारंवार होणारी परिनियमांची आणि कायद्याची मोडतोड थांबवन्याची  तसेच प्राध्यापकांची सुट्टी परीक्षेसाठी वापरणार असाल तर तेवढे दिवस महाविद्यालय उशिरा सुरू करावे अशी मागणी यावेळी बुक्टोच्यावतीने करण्यात आली. आंदोलनानंतर प्राध्यापकांचे शिष्ठमंडळ आणि कुलगुरु पेडणेकर यांच्यात बैठकी जाली. या बैठकीमध्ये १५ ते २॰ मे दरम्यान अँकेडेमिक कौंसीलची बैठक बोलावून जूनमध्ये महाविद्यालये उशिरा सूरू करण्याबाबतचा निर्णय घेऊन प्राध्यापकांना दिलासा देण्याबाबत आग्रही भूमिका घेईल, असे आश्वासन कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी दिले.  या आंदोलनात परीक्षेचे कामात बाधा न आणता विविध महाविद्यालयातील १५0 प्राध्यापक सहभागी झाले असल्याची माहिती बुक्टो संघटनाच्या मधु परांजपे यांनी दिली.

Conclusion:प्राध्यापकांनी व्यक्त केला कुलगुरूंविरोधात संताप; भर उन्हात केली निदर्शने
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.