मुंबई- 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत जखमी झालेल्या देविका रोटावन (21) या तरुणीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. राज्य सरकारने आर्थिक दुर्बल गटातून राखीव घर उपलब्ध करुन द्यावी या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पदवी शिक्षणाचा खर्च राज्य शासनाने उचलावा, अशी मागणी देविका रोटावन हिने याचिकेत केली आहे.
देविका रोटावन हिच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत देविका हिने तिचे म्हणणे मांडले आहे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे देविकच्या कुटुंबाला घराचे महिन्याचे भाडे भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. सध्या देविका तिचे वडील आणि भावासोबत बांद्रा परिसरातील सुभाष नगर येथे राहत आहे.
26 नोव्हेंबर 2008 या दिवशी देविका ही नऊ वर्षाची असताना तिच्या वडील आणि भावासोबत पुण्याला जाण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आली होती. यावेळी अचानक आतांकवाद्याच्या बंदूकीची एक गोळी तिच्या पायाला लागल्यामुळे ती खाली कोसळली व बेशुद्ध झाली होती. या दरम्यान पोलिसांनी तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते जिथे तिच्यावर सहा वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
2008 च्या घटनेनंतर ज्यावेळेस देविका पुर्णपणे बरी होऊन रुग्णालयातून तिच्या घरी आली होती. त्यावेळेस केंद्रातील व राज्यातील प्रतिनिधींनी तिच्या चाळीतल्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. त्यावेळेस तिला मुंबईत घर मिळवून देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. 26/11 च्या झालेल्या हल्ल्यात मध्ये ती महत्वाची साक्षीदार सुद्धा राहिलेली आहे. 26/11 मुंबई आतंकवादी हल्ल्यात अटक करण्यात आलेला आतंकवादी अजमल कसाब याला ओळखण्यासाठी देविका हिची साक्ष घेण्यात आली होती.