ETV Bharat / state

Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण; तहव्वूर राणाविरोधात पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र

Mumbai Terror Attack : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं तब्बल 415 पानाचं आरोपपत्र दाखल केलं असून, तहव्वूर राणावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

Mumbai Terror Attack
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 7:47 AM IST

Updated : Sep 26, 2023, 2:16 PM IST

मुंबई Mumbai Terror Attack : जगाला हादरवून टाकणाऱ्या मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. या हल्ल्यातील आरोपी तथा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा हस्तक तहव्वूर राणा याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं तहव्वूर राणाविरोधात तब्बल 415 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र किल्ला कोर्टातील न्याय दंडाधिकाऱ्यांकडं दाखल केलं आहे. दरम्यान या प्रकरणाची आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली.

  • 26/11 Mumbai terror attack case | "Mumbai Police filed chargesheet against Tahawwur Rana yesterday wherein they stated that he was also deeply involved in the criminal conspiracy behind the terror attack on 26/11. The court has asked us to advance our submissions for further… pic.twitter.com/mWbrKn2yG3

    — ANI (@ANI) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई पोलिसांनी सोमवारी तहव्वूर राणाविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये पोलिसांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागील गुन्हेगारी कटात तो सामील होता, हे स्पष्ट केलं. न्यायालयानं आम्हाला त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं आहे. तहव्वूर राणाचं प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्यासाठीचं अपील टकणार नाही. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पण स्थगितीला तीव्र विरोध करेल - उज्वल निकम, विशेष सरकारी वकील

मुंबई दहशतवादी हल्ल्यात राणाचा सहभाग : जगाला हादरवून सोडणारा मुंबईवरील 26/11 हा दहशतवादी हल्ला अत्यंत वेदनादायी आहे. भारतीय नागरिकांच्या मनावर या हल्ल्यानं मोठा घात झाला होता. असंख्य निरपराध नागरिक मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडले होते. हा हल्ला करण्याच्या कालावधीमध्ये आरोपी असलेला सूत्रधार तहव्वूर राणा हा 11 ते 21 नोव्हेंबर 2008 या कालावधीत मुंबईतच तळ ठोकून होता, असा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्याचा या संपूर्ण हल्ल्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. या संदर्भाचे आरोपपत्र न्यायदंडाधिकारी न्यायालयात मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलं आहेत.

डेव्हिड कोलमन हेडलीला केली मदत : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 रोजी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे इतर कुख्यात दहशतवादी सहभागी होते. या संपूर्ण कटात तहव्वूर राणानं दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप देखील या आरोपपत्रात मुंबई गुन्हे शाखेनं केला आहे.

राणा पत्रकाराच्या खुनात भोगत आहे शिक्षा : तहव्वूर राणा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी 415 पानाचं आरोपपत्र तयार केलेलं आहे. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र किल्ला कोर्टातील न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलं आहे. कॅनडाचा नागरिक असलेला तहव्वूर राणा एका पत्रकाराच्या खून प्रकरणी अमेरिकेच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर पत्रकाराचा खून केल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला अमेरिकेत कठोर शिक्षा दिली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हे आतापर्यंतच चौथं पुरवणी आरोपपत्र मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलं आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानच्या लष्करात डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

हेही वाचा :

  1. Mumbai terror Attack : 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाकडून मंजुरी
  2. Mumbai 26/11 Attack : 'आरोपी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हे भारतासाठी मोठे यश'

Last Updated : Sep 26, 2023, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.