ETV Bharat / state

अन्यथा अंबानींच्या बंगल्यात घुसून ताबा घेऊ; मुंबई भाडेकरू परिषदेचा इशारा - मुंबई भाडेकरू परिषद अंबानी बंगला न्यूज

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. कोरोना रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एसआरएच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत मात्र, पैसेवाल्यांची टॉवरमधील घरे ताब्यात घेतली नाही. पैसेवाल्यांचे टॉवर आणि अंबानी यांचा बंगला ताब्यात घेतला नाही तर आम्ही बंगल्यात घुसून त्याचा ताबा घेऊ, असा इशारा मुंबई भाडेकरू परिषदेने दिला आहे.

Ambani's house
अंबानींचे घर
author img

By

Published : Jun 17, 2020, 7:15 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत असल्याने क्वारंटाईन करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या नव्या इमारती ताब्यात घेतल्या जात आहेत. एसआरएच्या इमारतींमध्ये गरीब राहत असल्याने क्वारंटाईन करण्यासाठी त्यांची घरे न घेता रिक्त असलेल्या टॉवरमधील घरे आणि श्रीमंताचे बंगले ताब्यात घ्यावेत, अशी मागणी मुंबई भाडेकरू परिषदेने केली आहे. परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी ही मागणी केली. गरिबांची घरे क्वारंटाईनसाठी घेतल्यास उद्योगपती अंबानीच्या घरात घुसून त्याचा ताबा घेऊ, असा इशारा मुंबई भाडेकरू परिषदेने दिला आहे.

अन्यथा अंबानींच्या बंगल्यात घुसून ताबा घेऊ

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. कोरोना रुग्णांच्या सहवासात येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एसआरएच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे ज्या झोपडी धारकांना ही घरे मिळायला हवी होती, ती अद्याप मिळालेली नाहीत. या इमारती बांधून तयार व्हाव्यात या प्रतिक्षेत झोपडीधारक 7 ये 10 वर्ष भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. आता तर लॉकडाऊनमध्ये घरभाडे देणे या नागरिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे एसआरएच्या इमारतीमधील झोपडीधारकांची घरे त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी भाडेकरू परिषदेने केली.

महानगरपालिकेने गरिबांची एसआरएमधील घरे ताब्यात घेतली मात्र, पैसेवाल्यांची टॉवरमधील घरे ताब्यात घेतली नाही. हा दुजाभाव असल्याने पालिकेने पैसेवाल्यांचे टॉवरही ताब्यात घ्यावेत. उद्योगपती मुकेश अंबानींच्या 27 मजल्यांच्या बंगल्यात 5 व्यक्ती राहतात. त्या प्रत्येक व्यक्तीला एक-एक मजला देऊन इतर मजले कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरावेत, अशी मागणीही भाडेकरू परिषदेने केली. पैसेवाल्यांचे टॉवर आणि अंबानी यांचा बंगला ताब्यात घेतला नाही तर आम्ही बंगल्यात घुसून त्याचा ताबा घेऊ, असा इशारा परिषदेने दिला आहे.

सरकारने मोकळ्या जागा, भूखंड, बंद पडणाऱ्या कंपन्या, कारखान्यांच्या जागा बिल्डरांना देणे बंद करून त्यावर कायमस्वरूपी सरकारी रुग्णालये उभरावीत. टॉवरमध्ये अनेक रिकामे फ्लॅट जे गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेले आहेत, ते पालिकेने आणि सरकारने ताब्यात घ्यावेत. महालक्ष्मी परिसरातील गोल्फ मैदानाला उपनगरात जागा दिली असल्याने ते मैदानही ताब्यात घ्यावे, असे मत भाडेकरू परिषदेने मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.