ETV Bharat / state

Heavy Rain In Mumbai : संततधार पावसाचा मुंबईला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल - संततधार पावसाचा जोरदार तडाखा

मुंबई शहरात सकाळपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरात पाणी तुंबायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सब वेमध्ये पाणी भरल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र पंपाने पाणी उपसून काढल्यामुळे अंधेरी सब वेमधील वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

Heavy Rain In Mumbai
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2023, 10:56 AM IST

Updated : Jul 14, 2023, 11:03 AM IST

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबई : मायानगरीला संततधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून पावसाचे पाणी तुंबल्यामुळे अंधेरी सब वे बंद करण्यात आला होता. पम्पाच्या मदतीने सब वेमधील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आल्याने आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागात पाणी भरत आहे. आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरात धुवांधार पावसाचा कुर्ला, भांडुप, वांद्रे भागाला तडाखा : चार दिवसांपासून लांबलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावत मुंबईकरांना चांगलेच झोडपले. सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. मुंबईसह उपनगरात चांगलाच कोसळलेल्या पावसामुळे घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड, कुर्ला, सायन, वडाळा, वांद्रे आदी सखल भागात पाणी साचले. रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला. रेल्वे वाहतूक मात्र उशिराने धावत होती. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सलग दोन तास पावसाचा जोर कायम : दडी मारलेल्या पावसाची शुक्रवारी सकाळपासूनच कोसळधार सुरु होती. कुर्ला, चेंबूर, परळ, दादर, वांद्रे, सीएसटी, भायखळा, सायन, चुनाभट्टी आदी भागात जोरदार पर्जन्यवृष्टी केली. सलग दोन तास पावसाचा जोर कायम होता. रस्ते वाहतूक यामुळे खोळंबली. रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याने वेळापत्रक कोलमडून पडले. सकाळी कामावर जाण्याची वेळ आणि वाहतुकीचा उडालेला बोजवारा, यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. त्यामुळे कार्यालय गाठताना चाकरमान्यांना मोठी धावपळ करावी लागली. पावसामुळे घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, सायन, वडाळा, अंधेरी, बोरिवली, मानखुर्द, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले होते. मिलन सबवे, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतूक वळवण्यात आली होती.

अंधेरी भुयारी मार्ग बंद : मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागात सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करून त्यात साचलेले पाणी पंपाच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. आगामी 24 तासात मुंबईसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडणार असून, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. मुंबईत सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे.

शहरात इतकी झाली पावसाची नोंद : गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी ८ वाजतापर्यंत शहरात 53.54 मीमी, पूर्व उपनगरे 25.06 आणि पश्चिम उपनगरात 26.23 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई मनपाच्या आप्तकालीन विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे.

समुद्राला आज भरती : मुंबईच्या समुद्रात सकाळी सव्वा दहा वाजता आणि रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी भरती येणार आहे. समुद्र किनाऱ्यावर जवळपास 3.93 मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. खवळलेल्या समुद्रापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, उंच लाटा अंगावर घेण्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर जीवरक्षक, पोलीस, अग्निशमन दलाची नजर असणार आहे.

शहरातील वाहतूक विस्कळीत : मुंबई शहरात जोरदार पाऊस होत असल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाहतूक स्वामी विवेकानंद रोडकडे वळवण्यात आली होती. मात्र आता पाणी काढण्यात आले असून हा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Heavy Rain Alert : उत्तराखंड, उत्तर प्रदेशात अति मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या भागाला आहे मुसळधार पावसाचा धोका
  2. Maharashtra Weather Update Today: रेड अलर्ट असताना रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो, सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Last Updated : Jul 14, 2023, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.