मुंबई - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरूच आहे. मुंबई पोलीस दलात मंगळवारी 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारी पदी नव्या पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.
अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात वाझे यांच्या अटकेनंतर वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता सीआययुच्या प्रभारी पदी पीआय मिलिंद घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खंडणीविरोधी पथकाच्या प्रभारी पदी योगेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
23 मार्चला 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई गुन्हे शाखेच्या 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 23 मार्च रोजी करण्यात आल्या होत्या. जवळपास मुंबईतील सर्व युनिट प्रमुखाच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यावेळी रियाजुद्दीन काझी यांची बदली सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली होती. तर सीआयु युनिटचे एपीआय प्रकाश यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. हे दोन्ही अधिकारी अँटिलिया स्फोटक प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
हेही वाचा - दाभोळकर-पानसरे मर्डर केस : पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या हत्या आणि वर्षानुवर्ष तपास रखडणं ही बाब निंदनीय - उच्च न्यायालय
हेही वाचा - घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मोदी सरकारचा विरोध; दिलं 'हे' कारण