ETV Bharat / state

मुंबई पोलिसांकडून गेल्या 48 तासात 5877 वाहने जप्त - mumbai lockdown news

मुंबई पोलिसांनी मागील दोन दिवसांत कारवाई करत 5 हजार 877 वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागील 24 तासात 241 जणांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे नोंदवण्यात आले. सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत नोंदवण्यात आले आहेत.

mumbai police news
मुंबई पोलीस न्यूज
author img

By

Published : Jul 2, 2020, 12:28 PM IST

मुंबई-कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा 31 जुलै पर्यंत वाढवला गेला आहे. गेल्या 48 तासात मुंबई शहरात रस्त्यावर विनाकारण वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत 5 हजार 877 वाहन जप्त केली आहेत. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 420 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

20 मार्च ते 1 जुलै या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचार बंदीचे उल्लंघन केल्याच्या 12251 प्रकरणात तब्बल 25267 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 3147 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 7617 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 14512आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1234, मध्य मुंबईत 2316, पूर्व मुंबई 2118, पश्चिम मुंबईत 2189, उत्तर मुंबईत 4394 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या 24 तासांत मुंबईत 241 गुन्हे पोलिसांनी कलम 188 नुसार नोंदविले असून यात सर्वाधिक 120 गुन्हे उत्तर मुंबईत नोंदविण्यात आले आहेत. या खालोखाल दक्षिण मुंबईत 13 गुन्हे , मध्य मुंबईत 23 , पूर्व मुंबईत 62 , पश्चिम मुंबईत 23 अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.