ETV Bharat / state

वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात - sachin vaze update

बुधवारी पोलीस अधिकारी सचिन वझे यांची एटीएस कडून तब्बल 10 तास चौकशी करुन जबाब नोंदण्यात आला. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी ही तब्बल 4 महिने सचिन वझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती, असे आरोप मृत हिरेन मनसुख यांच्या पत्नीकडून दिलेल्या तक्रारीत करण्यात आले आहे.

sachin vaze
सचिन वझे
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:46 PM IST

Updated : Mar 12, 2021, 5:27 PM IST

मुंबई - हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वझे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता त्यांची रवानगी नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष-1मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आजच वझे यांना क्राइम ब्रांचमधून सुरुवातीला नियंत्रण कक्षात पाठवले गेले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी सचिन वझेंनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया.

एटीएसने नोंदवला वझे यांचा जवाब -

बुधवारी पोलीस अधिकारी सचिन वझे यांची एटीएस कडून तब्बल 10 तास चौकशी करुन जबाब नोंदण्यात आला. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी ही तब्बल 4 महिने सचिन वझे या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती, असे आरोप मृत हिरेन मनसुख यांच्या पत्नीकडून दिलेल्या तक्रारीत करण्यात आले आहे. दरम्यान, 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानंतर यामध्ये बनावट नंबर प्लेट, जिलेटिन 20 कांड्या व एक धमकीचे पत्र आढळून आले होते. या संदर्भात स्कॉर्पिओ गाडी चा तपास घेतला असता ही गाडी ठाण्यातील हिरेन मनसुख या व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे समोर आले होते. सचिन वझे यांनी ठाण्यातील हिरेन मनसुख यांचा जबाब नोंदवून घेतला होता. मात्र, जवाब नोंद घेतल्यानंतर केवळ दोन दिवसानंतरच मुंब्र्यातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आलेला होता.

नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वझे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली होती. सचिन वझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असून कलम 201च्या अंतर्गत त्यांना अटक करावी म्हणून महाविकास आघाडीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली. मात्र, या संदर्भात एटीएस तपास करत असून सचिन वझे यांना क्राईम ब्रँचमधून बदलण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा - मुकेश अंबानी प्रकरणातील गाडीचा मालक मनसुख हिरेन नाहीच!

एकाच दिवसात दुसऱ्यांदा बदली -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस अधिकारी सचिन वझे यांची पोलीस नियंत्रण कक्षाच्या विभागात बदली करण्यात आली होती. सभागृहात माहिती दिल्या प्रमाणे सचिन वझे यांची बदली करण्यात आली आहे. वझे यांना गुन्हे शाखेतून हटवून नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. मात्र, वझे यांची ही बदली तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे सांगण्यात आले होते.

सचिन वझेंनी आरोप फेटाळले -

एटीएस चौकशीदरम्यान सचिन वझे यांनी कबूल केलेला आहे, की मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ज्यावेळेस सापडली होती, त्या घटनेपूर्वीपासून ठाण्यात राहणाऱ्या हिरेन मनसूख यास आपण ओळखत होतो. मात्र, त्याच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, असे म्हणत सचिन वझें यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Last Updated : Mar 12, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.