ETV Bharat / state

Nirbhaya Squad Mumbai : महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचं पाऊल, मुंबई पोलीस दलात आता निर्भया पथक - मुंबई निर्भया पथक

आज मुंबईतील पोलीस आयुक्त इमारतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्चुअल उपस्थितीमध्ये व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ( Nirbhaya Squad Mumbai inauguration ) करण्यात आले. महिलांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हे पथक मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

निर्भया पथक
Nirbhaya Squad Mumbai
author img

By

Published : Jan 26, 2022, 4:01 PM IST

मुंबई - भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या निर्भया पथकाचे ( Nirbhaya Squad ) आज मुंबईतील पोलीस आयुक्त इमारतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्चुअल उपस्थितीमध्ये व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ( Nirbhaya Squad Mumbai inauguration ) करण्यात आले. महिलांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हे पथक मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

मुंबई पोलीस दलात आता निर्भया पथक
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,

'मुख्यमंत्री म्हणून आज हा उपक्रम सुरू करत असल्याचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाला मी व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित असलो तरी माझा पाठिंबा पूर्णपणे आहे. सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कुठेही कमी पडणार नाही. ज्या पोलीस जवानांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या सर्वांचे अभिनंदन. साधू संतांच्या या महाराष्ट्रात ज्याच्यावर संस्कार घडत नाहीत. त्यांना कायद्याचा धाक दाखवावा लागतो. महाराष्ट्र हा जगात महिलांचे रक्षण करण्यात सक्षम महाराष्ट्र आहे, हे आपण दाखऊन देऊ. या नवीन उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा'.

महिलांच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये - गृहमंत्री

राष्ट्रपती पदक मिळाल्यामुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे. आज निर्भया पथकाची सुरुवात झाली त्याचा आनंद आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांना गौरवशाली इतिहास आणि परंपरा आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. साकीनाका घटनेत 10 मिनटात पाठपुरावा करून निर्णय दिला. महिला आत्याचाराच्या घटना अलीकडे वाढत आहेत ही चिंतेची बाब. महिलांच्या संदर्भात घडणारे अपराध 80 टक्के परस्पर परिचयाच्या व्यक्तीकडून होत असतात. परंतु पोलीस दलाला बदनाम केले जाते. समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे. शक्ती कायदा आणताना काही विरोध झाला नाही. पोलीस स्थानकात एखादी महिला तक्रार घेऊन येते. त्या दरम्यान त्याची दखल घेण्यात यावी. त्याकडे दुर्लक्ष करू नये म्हणजे मोठ्या घटना घडणार नाहीत. जिथे महिला सुरक्षित नाहीत. तिथे समाज सुद्धा प्रगती करू शकत नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भयमुक्त असावी म्हणून महिलांवरील अत्याचारात २१ दिवसात आरोपीला शिक्षा होईल, असा महत्वाचा शक्ती कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे. लवकरच राज्यपाल त्याला अंतिम मजुरी देतील. महिलांच्या सुरक्षेविषयी विरोधक नेहमीच बोलत असतात. ते त्यांच काम आहे परंतु आपण कृतीतून त्यांना उत्तर देत आहोत, असेही गृहमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री बॅक इन ॲक्शन - आदित्य ठाकरे

आज मुख्यमंत्री तब्बल दोन महिन्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहिलेल्या कारणावरून पर्यावरण मंत्री व मुख्यमंत्री याचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, की मुख्यमंत्री बॅक इन ॲक्श आले आहेत. मागील दीड महिन्यापासून ते व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित होते. परंतु आता पुन्हा सक्रिय झाल्याचा आनंद आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. त्याच बरोबर निर्भया पथकाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की निर्भया पथक हे मुंबईतील विविध ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे काम करणार आहे. ज्या घटना घडत आहे त्यांच्यावर आळा बसण्यासाठी पथक महत्त्वाची कामगिरी बजावेल. तसेच महिलांविषयी समाजामध्ये काही गैरसमज असतील ते दूर होणे गरजेचे आहे. शालेय अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा 'गुड टच व बॅड टच' याविषयी चौथी पासूनच मुला-मुलींना यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विविध महानगरपालिका बरोबर चर्चा करून गल्ली-गल्ली मध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाईट लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

निर्भया मदत पथकासाठी 103 नंबर डायल करा -

महिला सुरक्षेच्या दृष्टीने महिलांच नाव लौकीक कायम रहाव म्हणून निर्भया पथक सज्ज झाले आहे. महिला आत्त्याचाराच्या गुन्ह्यात २०२० च्या तुलनेत वाढ असली तरी २०२१ मध्ये घट झाली आहे असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले. तरी त्यातही आता निर्भया पथक महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असून निर्भया पथकाच्या मदतीसाठी १०३ नंबर डायल करावा. तसेच
निर्भया पथकाची थीम प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी साकारली असून त्याला आवाज बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिला आहे. ५ निर्भया समुपदेशन केंद्राचे उद्घाटन सुद्धा आज केले गेले. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्भया पथकासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सुपूर्द केला.

हेही वाचा - Parade on Rajpath : प्रजासत्ताक दिनी भारतीय संस्कृती आणि शौर्याचे भव्य प्रदर्शन; पाहा सर्व घडामोडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.