ETV Bharat / state

Mumbai Police : मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन, पोलिसांकडून तपास सुरू

मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा फेक फोन कॉल रविवारी मध्यरात्री 2 वाजता पोलीस सहआयुक्तांना आला. त्यानंतर पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली. आता त्या फेक फोन कॉल घटनेचा छडा लागला आहे. यशवंत माने असे फेक फोन कॉल करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Mumbai Police
सहपोलीस आयुक्त
author img

By

Published : Feb 13, 2023, 1:25 PM IST

Updated : Feb 13, 2023, 1:43 PM IST

मुंबई : मुंबई पोलीस सहआयुक्तांना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे, असे त्याने सांगितले. तसेच तेथे घटनास्थळी तातडीने पोलीस पाठवण्यास सांगितले. पोलीस सहआयुक्तांनी त्याला अधिक विचारणा केली असता त्याने अपशब्द वापरून फोन कट केला. सहपोलीस आयुक्तांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रणाला दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ मीरा भाईंदर पोलीस नियंत्रणेला माहिती दिली. याप्रकरणी मीरा भाईंदर पोलीस आणि मुंबई पोलीस हे दोन्ही तपास करत आहेत.

अपशब्द वापरून फोन कट : याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे अज्ञात कॉलरला शोधण्याचे तपासकार्य देखील पोलिसांनी जलद गतीने सुरू केले होते. मुंबई पोलीस दलातील पोलीस सहआयुक्तांना रात्री 2 वाजता उशिरा एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव यशवंत माने असल्याचे सांगितले. त्याशिवाय पुण्याचे गुगल ऑफिस उडवण्याच्या धमकीचा कॉल, मुंबईतील बीकेसी येथे असलेल्या गुगल ऑफिसमध्ये आला होता.

पुण्याचे गुगल ऑफिस उडवण्याची धमकी : गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धमकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. या कॉलनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक बिडीडीएस पथकाकडून रविवारी रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कॉलरने सांगितले की, त्याचे नाव पनयम शिवानंद आहे आणि तो हैदराबादचा आहे. चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. कॉलरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बीकेसी पोलिसांनी सांगितले.

दहशतवादी हल्ल्याची धमकी : मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्याची धमकी काही दिवसांपूर्वी ( दि. 3 शुक्रवार) रोजी ट्विटरवरून देण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून महत्वाच्या ठीकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी नंतर एक मोठा खुलासा समोर आला. रशियाहून गोव्याला येणाऱ्या प्रवाशाने फ्लाइटमध्ये फेक मेल आयडीवरून ट्विटर करत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली होती. स्वतःची ओळख तालिबानी असल्याची केली होती. तालिबान संघटनेचा नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार दहशदवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तो मेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला क्रमांक पाकिस्तानमधील कराची येथून ऑपरेट करण्यात अल्याचे तपासत समोर आले आहे.

हेही वाचा : Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी; कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ

Last Updated : Feb 13, 2023, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.