ETV Bharat / state

Russian YouTubers : इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये स्टंटबाजीचा प्रयत्न; 2 रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल

मुंबईत स्टंट करण्यासाठी जाणाऱ्या दोन रशियन यूट्यूबर्सना ताडदेव पोलिसांनी पकडले ( Taddev police caught Russian YouTuber ) आहे. हे दोन्ही रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी ट्विन टॉवर इमारतीत गेले होते. ही बाब इमारतीमधील ( Entrance to Imperial Twin Towers ) सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

two Russian YouTubers
2 रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Dec 27, 2022, 12:32 PM IST

Updated : Dec 27, 2022, 2:07 PM IST

मुंबई : स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड ( Stunt video record ) करण्यासाठी काल ताडदेव परिसरातील इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये प्रवेश ( Entrance to Imperial Twin Towers ) केल्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल केला ( case registered against two Russian YouTubers ) आहे. आयपीसीच्या कलम ४५२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ताडदेव पोलिसांनी स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परिसरातील इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये प्रवेश केलेल्या दोन्ही रशियन यूट्यूबर्सना अटक केली. रोमन प्रोशिन (३३) आणि मॅक्सिम शेरबाको (२५) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी याबाबत रशियन वाणिज्य दूतावासाला कळवले आहे. अजूनही त्यांना अटक केलेली नाही.

कोणता गुन्हा दाखल ? : दोघांना पकडल्यानंतर खाजगी मालमत्तेत घुसखोरी करणे, जीव धोक्यात घालून स्टंट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ताडदेव पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती रशियन दूतावासाला देखील दिली आहे. हे दोन्ही रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी इमारतीत गेले होते. ही बाब इमारतीमधील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर अडीच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर या दोन्ही रशियन यूट्यूबर्सना ताडदेव पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

यूट्यूबर्स स्टंट करण्यासाठी इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्पेक्ल्समध्ये : सोमवारी रात्री हा स्टंट कारण्याचा प्रकार घडला. हे दोन्ही रशियन यूट्यूबर्स स्टंट करण्यासाठी इम्पीरियल ट्विन टॉवर कॉम्पेक्ल्समध्ये गेले होते. ह्या 60 मजल्यांचे ट्विन टॉवर आहेत. रहिवासी इमारत आहे. यामध्ये शहरातील अनेक कुटुंब राहतात. सीसीटीव्ही कंट्रोल रुममधील सुरक्षारक्षकाने या दोन्ही यूट्यूबर्सना वरच्या मजल्यावर चढून जाताना पाहिले. त्यानंतर सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सुरक्षारक्षकांना जुमानले नाही. नंतर सुरक्षारक्षक आणि ताडदेव पोलिसांना संपर्क साधला. दोन तासांहून अधिक चाललेल्या नाट्यानंतर त्यांना पोलिसांना पकडण्यात अखेर यश आले. त्यानंतर त्यांना ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अटक करण्यात आली.

स्टंटचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता : दोघांनी पोलिसांना सांगितले की, ते पायऱ्यांवरुन एका टॉवरच्या 58व्या मजल्यापर्यंत गेले होते. स्टंट करत ते इमारतीवरुन खाली येणार होते. त्यांना आपल्या या स्टंटचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता

Last Updated : Dec 27, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.