ETV Bharat / state

नायलॉन मांजा वापराल तर खबरदार, मुंबई पोलिसांनी घातली बंदी - नायलॉन मांजा

Nylon Manja: नायलॉन मांजाच्या वापरामुळे मानवासह पशु, पक्ष्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. (Nylon Manja Harmful) ही बाब विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी आता नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. 13 जानेवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Police) वाचा सविस्तर बातमी.

Nylon Manja
नायलॉन मांजा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 7:15 PM IST

मुंबई Nylon Manja : संक्रांतीच्या सणाच्या आसपास मुंबईत पतंग उडवले जातात. मात्र, त्यात प्लास्टिकच्या तसंच नॉयलॉनमांजाचा वापर होतो. त्यापासून मानव आणि पशु-पक्ष्यांना धोका निर्माण होतो. (Effects of nylon Manja) त्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. 13 जानेवारी पासून ही बंदी लागू केली आहे. (Animals and Birds)

मांजामुळे पोलिसाचा गेला जीव : मांजाचा वापर सध्या सर्रास वाढलाय. नाशिकमध्ये 20 दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला अशाच नायलॉन मांजामुळे जीव गमवावा लागला होता. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं घेतली होती. त्याच वेळी न्यायालयानं राज्यातील पोलिसांना अशा प्राणघातक मांजावर बंदी घालण्याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. आता मुंबई पोलिसांनी 13 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी आणली आहे.

नायलॉन मांजा पर्यावरणाला हानी पोहचवणारा : नायलॉन मांजा वापरामुळे तो जमिनीवर पडतो. तेव्हा त्याचे विघटन होत नाही. तो मातीत विरघळत नाही. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसंच मांजा गटार, नाले येथे अडकून बसतो. परिणामी कचरा साचतो आणि नाले तुंबतात.

वीज पुरवठ्यावर होतो परिणाम : नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर तो जाऊन अडकून पडतो. वीज सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हर होतो. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो आणि याचा विद्युत यंत्रणेवर ताण निर्माण होतो.

दुर्मीळ पक्ष्यांना मोठा फटका : नायलॉन मांजामुळे अनेकदा आकाशात उंच उडणारे दुर्मीळ पक्षी जखमी होतात. उंचच उंच पतंग उडतो आणि त्यामुळेच दुर्मीळ पक्षी जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा त्यांच्या शरीराला मांज्यामुळे दुखापत होते. बहुतेकदा असे पक्षी मरण पावतात. काही प्रजाती ह्या अंत्यत दुर्मीळ आहेत. ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची संख्या कमी होते.

नायलॉन मांजाचा वापर हा दंडनीय गुन्हा : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी बाबत पोलीस उपायुक्त अभियान विभाग मुंबई त्यांनी म्हटले आहे की नायलॉन मांजावर, त्याच्या वापरावर किंवा त्याची विक्री यावर नाहीतर त्याची साठवणुकीवर बंदी घातली आहे. ह्याचा कालावधी 13 जानेवारी पासून ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल. ह्या नियमांचे उल्लंघन केले तर दंडनीय अपराध मानला जाईल.

हेही वाचा:

  1. उद्धव ठाकरे काळारामाचे नव्हे तर तळीरामाचे भक्त, आशिष शेलार यांची टीका
  2. मल्लिकार्जुन खरगेंना 'इंडिया' आघाडीचं नेतृत्व मिळाल्यानंतर काय म्हणाले शरद पवार?
  3. मल्लिकार्जुन खरगे 'इंडिया' आघाडीचे समन्वयक, नितीश कुमारांची माघार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.