ETV Bharat / state

टीआरपी घोटाळा प्रकरण : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खनचंदानी यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - टीआरपी घोटाळा प्रकरण

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खनचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईत मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विकास खनचंदानी यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे, असे अर्णब गोस्वामी म्हणाले.

विकास खनचंदानी
विकास खनचंदानी
author img

By

Published : Dec 13, 2020, 11:55 AM IST

Updated : Dec 13, 2020, 10:47 PM IST

मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खनचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईत मॅजिस्ट्रेट कोर्टाने खनचंदानी यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विकास खानचंदानी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेले ते 13 वे व्यक्ती आहेत.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास रोखण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. याची दखल घेण्याचे आवाहन अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयाला केले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन प्रादेशिक वाहिन्या टीआरपी रेटिंग घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला.

गत आठवड्यात रिपब्लिक टीव्हीच्या सीओओ प्रिया मुखर्जी यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला. कोर्टाने प्रियाला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर सोडले. परंतु त्यांना आठवड्यातून एकदा संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खनचंदानी यांच्या अटकेवर रिपब्लिक वृत्तवाहिनीचे अर्णब गोस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. मुंबई पोलिसांना पूर्ण सहयोग दिल्यानंतरही त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रेही नाहीत. विकास खनचंदानी यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे, असे अर्णब गोस्वामी म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांचे मुंबई पोलिसांवर आरोप -

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे वितरक घनश्याम सिंह यांना पोलिसांनी मारहाण केली आहे, असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या याचिकेतून केला होता. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असे ते याचिकेत म्हणाले होते. घनश्याम सिंह यांना 13 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यानंतर 5 डिसेंबरला त्यांना जामीनावर सोडण्यात आले.

सीबीआयला प्रतिवादी करण्याची मागणी फेटाळली -

अर्णब गोस्वामी यांच्या एआरजी आउटलायरकडून टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, यानंतर राज्य सरकारने सीबीआयला जर महाराष्ट्र येऊन तपास करायचा असेल तर त्या अगोदर महाराष्ट्र सरकारची परवानगी घेणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सीबीआयला प्रतिवादी करण्यात यावे, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली होती.

1400 पानांचे आरोपपत्र दाखल -

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. यामध्ये रिपब्लिक वृत्तवाहिनीसह काही मराठी वाहिन्या व इतर वृत्तवाहिन्यांची नावे आरोपपत्रमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. नुकतेच मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून यासंदर्भात न्यायालयामध्ये 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये रिपब्लिक वृत्तवाहिनीसह इतर वृत्तवाहिन्यांच्या चालक व मालक यांना आरोपी म्हणून दाखवण्यात आलेले होते.

यापूर्वी 12 आरोपींना झाली आहे अटक -

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत विशाल वेध भंडारी, राव नारायण मिस्त्री, शिरीष सतीश पट्टणशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विजय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिष्रा, रामजी दूधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्वकर्मा, हरीश कमलाकर पाटील, अभिषेक भजनदास कोळवडे, आशिष अभीदूर चौधरी व घनश्याम सिंग

काय आहे टीआरपी घोटाळा -

चलचित्र वाहिन्यांचे टीआरपी ठरवण्यासाठी देशभरात 30 हजारांहून अधिक मापदंड तर मुंबईसारख्या शहरात 2 हजारांहून अधिक मापदंड करण्याची जबाबदारी बीएआरसीवर आहे. मात्र, याचे कंत्राट हंसा नावाच्या एजन्सीला देण्यात आले होते. टीआरपी छेडछाडीचे रॅकेट परदेशातही अस्तित्वात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईतील काही अशिक्षित लोकांच्या घरी इंग्रजी न्यूज चॅनल लावून ठेवण्याची अट हंसा एजन्सीकडून घालण्यात येत होती. यासाठी संबंधितांना महिन्याला ठराविक पैसेही दिले जात होते. या टीआरपी घोटाळ्यात दोन मराठी चॅनेल व एक भारतीय इंग्रजी न्यूज चॅनलचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही मराठी चॅनलच्या मालकांना मुंबईतून अटक केली आहे.

हेही वाचा - १५ वाहनांची एकमेकांना धडक; चार ठार, पाच जखमी..

Last Updated : Dec 13, 2020, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.