ETV Bharat / state

सैन्यातील दोन प्रशिक्षणार्थींंना चोरीच्या गुन्ह्यात अटक, आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मिळवली होती मेडल्स - नाशिक सैन्य प्रशिक्षणार्थीं बॉक्सर न्यूज

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले आणि सैन्यात प्रशिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केले आहे. या दोघांनी मित्राच्या घरी चोरी केल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.

Criminals
आरोपी
author img

By

Published : Oct 31, 2020, 12:15 PM IST

मुंबई - या दोघांनी रशिया, थायलंड, उज्बेकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल्स मिळवले. या कामगिरीमुळे त्यांना सैन्यदलामध्ये नोकरीही मिळाली. मात्र, त्यांनी सैन्य दलातील प्रशिक्षण सुरू असतानाच चोरीचा डाव आखून मित्राच्या घरातच चोरी केली. विशाल कुमार व चिराग चौधरी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. ज्या मित्राच्या घरी या दोघांनी चोरी केली होती, त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचे बिंग फुटले.

मित्राच्या घरी चोरी केलेल्या दोन खेळाडूंना पोलिसांनी अटक केली

नुकतेच सैन्यात झाले होते भरती -

आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल्स मिळवल्यामुळे विशाल आणि चिराग या दोघांनाही स्पोर्टस कोट्यातून सैन्यदलात नोकरी मिळाली होती. सध्या नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू होते.

मित्राच्याच घरी केली चोरी -

विशाल कुमार याची 2016मध्ये आरे परिसरात राहणाऱ्या सुनील याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर सुनील व विशाल हे दोघे एकमेकांना वारंवार भेटत. 9 ऑक्टोबरला विशाल कुमारने आपला अन्य एक मित्र चिराग चौधरीसोबत सुनीलच्या घरी रात्रभर पार्टी केली. पहाटे सुनील झोपला असल्याची संधी साधून विशाल कुमार आणि चिरागने सुनीलच्या घरातील आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व 37 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. सुनीलने या घटनेची तक्रार पोलिसांत दिली होती.

चौकशीत आढळले दोषी -

आरे पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला तेव्हा त्यांना सुनीलच्या इमारतीत लावलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाले. ज्यामध्ये विशाल कुमार व चिराग चौधरी हे पहाटे मुद्देमालासह इमारतीतून पळून जाताना आढळले. पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता हे दोघेही नाशिक देवळाली कॅम्प येथे असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी याची कल्पना सैन्य दलाला दिली. सैन्यामार्फतच दोघांची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हे दोघेही दोषी आढळल्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून चोरी केलेले आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये हस्तगत केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.