ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी केली अपहरण प्रकरणाची उकल; रायगडमधून तीन आरोपींना अटक

मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अशाच एका अपहरण प्रकरणाची उकल केली आहे. ज्यात आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना चांगले ओळखतात. अपहरण प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कर्जत रायगड येथून तीन आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Crime News
रायगडमधून तीन आरोपींना अटक
author img

By

Published : Jun 27, 2023, 8:29 AM IST

मुंबई : दिवसेंदिवस अपहरणाच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. ज्यात आरोपींचे तक्रारदारासोबत पैशाचे व्यवहार होते. त्यामुळे आरोपी कांदिवली येथून तक्रारदाराचे अपहरण करून दिलेले पैसे परत मागू लागले. अच्छेलाल चित्रू यादव (52), मनोहर हरिश्चंद्र देवघरे (36) आणि मनीष अशोक पंचरस (40) या तिन्ही आरोपींनी तक्रारदाराला कांदिवली येथून जबरदस्तीने रिक्षात बसविले. त्याला आरे कॉलनीच्या जंगलात नेण्यात आले. जिथे त्याच्या पत्नीच्या खात्यातून 2 लाख 75 हजार तर कुरार गावच्या एटीएममधून 1 लाखांची रोकड काढण्यात आली. त्यानंतर जबरदस्तीने करारावर स्वाक्षरी करून 30 लाख दिले नाही, तर कुटुंबीयांना उचलून नेले जाईल. अशा धमक्या देऊन आरोपी निघून गेले.

सापळा रचून आरोपींना अटक : घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कांदिवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत गिते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपींचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी रायगड जिल्ह्यातील तळ्यात लपल्याची माहिती मिळाली. आरोपींना पकडण्यासाठी कांदिवली पोलिसांनी स्टॉल मालकांच्या वेशात दूध गोळा करण्यासाठी स्टॉलवर पोहोचले. पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना तबेल्याच्या आतून अटक केली. अचेलाल चित्रू यादव (52), मनोहर हरिश्चंद्र देवघरे (36) आणि मनीष अशोक पंचरस (40, सर्व रा. कर्जत रायगड) अशी तीन आरोपींची नावे आहेत. कांदिवली पोलीस अपहरणाच्या वेळी आरोपींकडून जप्त केलेल्या पैशांचा तपास करत आहेत.

गुन्ह्याचा तपास : नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे घेण्यात आला. केलेल्या चौकशीमध्ये आरोपी अचेलाल यादव (वय ५२ वर्षे) याच्याबाबत महिती मिळाली. नमूद आरोपीचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी हे कर्जत, रायगड या ठीकाणी असल्याबाबत माहिती मिळाली. त्याच्यासोबत अजुन २ संशयित इसमाची माहिती मिळाली ते देखील कर्जत या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. आरोपींकडे गुन्ह्यातील मालमत्तेबाबत तपास चालु आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन त्याच्याकडे अधिक तपास करीत आहोत.

हेही वाचा :

  1. Attempt To Abduct Hindu Girl : पब्जी गेम खेळत हिंदू मुलीशी ओळख; महाराष्ट्रात येऊन बिहारच्या नराधमांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
  2. Police Remand of Advocate Khan Soulat Hanif : माफिया अतिकचा वकील खान सुलत हनिफही अडचणीत, पोलीस कोठडीत आज होणार चौकशी
  3. Thane Crime News: पोलिसांनी चिमुकल्याला पोहोचवले सुखरूप आईच्या खुशीत; अपहरण करून झारखंडमध्ये विक्री करणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.