ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी निर्मल लाईफस्टाईल डेव्हलपर्सचे धर्मेश आणि राजीव जैन यांना ठोकल्या बेड्या, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - builders fraud in Mumbai

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाईफस्टाईल डेव्हलपर्सचे संचालक धर्मेश जैन (55) आणि राजीव जैन (50) यांना गुरुवारी अटक केली. ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्स न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Mumbai Crime News
आर्थिक गुन्हेशाखेची कारवाई
author img

By

Published : Apr 28, 2023, 7:45 AM IST

Updated : Apr 28, 2023, 7:51 AM IST

मुंबई : स्वत:चे घर खरेदी करणे, हे अनेकांचे स्वप्न असते. अनेकजण आपले संपूर्ण आयुष्याभर जमापुंजी त्यासाठी जमा करतात. परंतु बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीमुळे अनेकांचे ते स्वप्न धुळीस मिळते. मुंबई पोलिसांनी अशाच दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिक धर्मेश आणि राजीव जैन यांनी मुलुंडमध्ये ऑलिम्पिया, ओमेगा, पॅनोरमा आणि निर्मल वन स्पिरिट अशा रहिवासी इमारत प्रकल्प राबवत असल्याचे सांगून 201 ते 2011 या काळात 34 ग्राहकांकडून 11 कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतली.

३ मे पर्यंत पोलीस कोठडी : विकासकांनी २०१७ मध्ये खरेदीदारांना सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही. फसवणूक झालेल्या खरेदीदारांनी एकत्र येऊन निर्मल लाइफस्टाईल होम बायर्स रिड्रेसल असोसिएशनची स्थापना केली. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुमार अरोरा यांच्यासह अन्य 33 तक्रारदार खरेदीदारांनी पोलिसांत तक्रार दिली. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरुवातीला मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर ते तपासासाठी ईओडब्ल्यूकडे हस्तांतरित करण्यात आले, असे अधिकारी म्हणाले.

आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल : त्यानुसार एप्रिल 2022 मध्ये धर्मेश जैन, राजीव जैन आणि पूजा जैन यांच्यासह अन्य आरोपींविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हेशाखेनेही याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. धर्मेश आणि राजीव हे नातेवाईक आहेत. पूजा या राजीव यांच्या पत्नी आहेत. तिला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही.

महारेराच्या प्रकल्पांच्या खरेदीविक्रीत दिवाळखोरी : महारेराच्या संकेतस्थळावरील नोंदणीकृत 308 प्रकल्पांकडून खरेदीविक्रीत दिवाळखोरी केल्याचे समोर आले आहे. महारेराने त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. महारेराकडील नोंदणीकृत 308 प्रकल्प आहे. त्यापैकी 115 प्रकल्प सध्या सुरू आहेत. 32 प्रकल्पांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. उर्वरित 193 प्रकल्प बंद झाले आहेत. त्यातील 150 प्रकल्पांतही 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : New Delhi Crime News : मॅट्रीमोनियल साईटवरून तब्बल 700 तरुणींची फसवणूक, दोन नायजेरियन भामट्यांना अटक

Last Updated : Apr 28, 2023, 7:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.