ETV Bharat / state

Uorfi Javed viral video : पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल - Uorfi Javed viral video news update

Uorfi Javed viral video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून अभिनेत्री उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ओशिवारा पोलीस ठाणे येथे कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

mumbai police action against Uorfi javed
पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 7:53 AM IST

मुंबई Uorfi Javed viral video : आपल्या अतरंगी फॅशनमुळं आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळं अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. मात्र या वेळेस उर्फीचा एक व्हिडिओ तिच्या अंगलट आलाय. अतरंगी ड्रेस घातलेल्या उर्फीला दोन महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण झालं होतं. आता या व्हिडिओमागचं सत्य पोलिसांनी सांगितलं असून पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

व्हिडिओतील तोतया निरीक्षक अटकेत : पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अभिनेत्री उर्फी जावेद, दोन महिला आणि अन्य संबंधित व्यक्तींनी फसवणुकीच्या उद्देशानं पोलिसांचा गणवेश आणि ओळखीचा वापर करून रील्स बनवल्या आहेत. उर्फी जावेदनं प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवला आणि तो फेसबुकवर, इन्स्टाग्रावर व्हायरल झाला. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. त्यानंतर सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाणे गु.र.क्र. १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच या व्हिडीओतील तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि त्यातील वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण : उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये अश्लील व्हिडीओप्रकरणी दोन पोलीस महिला उर्फीला ताब्यात घेत असल्याचं दिसतंय. सुरुवातीला अनेकांना हा व्हिडीओ खरा आहे असं वाटलं. पण केवळ प्रसिद्धीसाठी उर्फी जावेदनं हा व्हिडीओ शूट केल्याचं नंतर समोर आलं. दरम्यान, या व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांची बदनामी आल्यानं उर्फीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा -

  1. Uorfi Javed viral video : बोल्ड कपड्यातील उर्फी जावेदच्या अटकेचा व्हिडिओ निघाला प्रँक
  2. Urfi Javed receives death threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट
  3. Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.