मुंबई: मुंबई विमानतळावर खासगी विमान धावपट्टीवर घसरल्यानं प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. खराब हवामानामुळं हे विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर येत आहे. विमानतळावर टेक ऑफ आणि लँडिंग थांबविण्यात आलयं. खासगी विमानात ८ प्रवासी होते. VSR Ventures Learjet 45 या विमानाचा अपघात झालाय. हे विमान विशाखापट्टणम येथून मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट 45 विमान हे रनवे 27 वर लँडिंग करताना घसरले. ही माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली. डीजीसीएच्या माहितीनुसार विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. विमानतळावरील ड्युटीवरील अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आहे.
-
#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023#WATCH | VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No… pic.twitter.com/KxwNZrcmO5
— ANI (@ANI) September 14, 2023
तिघे जण जखमी- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे उड्डाणे वळवावी लागली आहेत. त्यामुळे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. हा अपघात सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटाला झालाय. विमानात ६ प्रवाशांसह २ क्रू मेंबर प्रवास करत होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटना घडताच विमानानं पेट घेतला. काही वेळातच अग्नीशमनकडून विमानाला लागलेली आग विझविण्यात आली.
अपघातानंतर ३४ विमाने वळविण्यात आली- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले, खासगी विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर प्रवास करत होते. धावपट्टीवरून विमान घसरल्यानं ३ जण जखमी झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर धावपट्टीवरील विमान दूर करण्याचे काम सुरू होते. सुरक्षेसाठी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारी ३४ विमाने वळविण्यात आली होती. त्यामध्ये इंडिगो १९, अक्सा ५, विस्तारा ६, इमिरेट्स १, एअर इंडिया २ आणि एअर आशियाच्या १ विमानाचा समावेश आहे.
-
The Runway is now open for operations post DGCA clearance at 18:47 after all safety checks were conducted. We request all passengers, to connect with their respective airline and check the schedule before leaving their homes. CSMIA sincerely regrets the inconvenience caused.
— CSMIA (@CSMIA_Official) September 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Runway is now open for operations post DGCA clearance at 18:47 after all safety checks were conducted. We request all passengers, to connect with their respective airline and check the schedule before leaving their homes. CSMIA sincerely regrets the inconvenience caused.
— CSMIA (@CSMIA_Official) September 14, 2023The Runway is now open for operations post DGCA clearance at 18:47 after all safety checks were conducted. We request all passengers, to connect with their respective airline and check the schedule before leaving their homes. CSMIA sincerely regrets the inconvenience caused.
— CSMIA (@CSMIA_Official) September 14, 2023
धावपट्टीवरील वाहतूक सुरळित- सर्व सुरक्षा तपासण्या झाल्यानंतर धावपट्टी सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटाला डीजीसीएच्या परवानगीनंतर वाहतुकीसाठी खुली आहे. संबंधित एअरलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाकडून ( CSMIA ) करण्यात आले. तसंच प्रवाशांनी विमान प्रवासाकरिता घर सोडण्यापूर्वी वेळापत्रक तपासावे, असे आवाहन केलंय. गैरसोयीबद्दल विमानतळ मनापासून दिलगीर असल्याचे कंपनीने एक्स या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-