ETV Bharat / state

क्रौर्याची परिसीमा ओलांडली!  सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह - womans body found stuffed in suitcase in kurla

Mumbai Murder News : मुंबईतील कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ल्यात सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलायं.

womans body found stuffed in suitcase in kurla
मुंबईतील कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 7:10 AM IST

Updated : Nov 20, 2023, 9:22 AM IST

मुंबई Mumbai Murder News : मुंबईतील कुर्ला येथे रविवारी (19 नोव्हेंबर) सकाळी सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय. तसंच या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सुटकेस बघून आला संशय : मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान सीएसटी रोडजवळील पुलाखालून एक व्यक्ती पायी जात असताना त्याला पुलाखाली एक सुटकेस दिसलं होतं. या सुटकेसबाबत संशय आल्यानं त्यानं लगेच यासंबंधीत माहिती पोलिसांना दिली. सदरील प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सुटकेसची तपासणी केली. पोलिसांना सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह हा 20 ते 25 वर्षांच्या महिलेचा असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • पोलीस अधिकारी काय म्हणाले : या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेनं टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली होती. प्रथमदर्शनी, लैंगिक अत्याचाराची कोणतीही चिन्हं आढळून आली नाहीत. तसंच महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत.

पोलिसांकडून तपास सुरू : या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलाय. तसंच ज्या भागात सुटकेस सापडली त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेनेही या प्रकरणी तपास सुरू केलाय. तसंच मृत महिलेची ओळख पटावी यासाठी अधिकारी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता महिलांची माहिती गोळा करत आहे. दरम्यान, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. वैद्यकीय पदवी, परवाना नसतानाही करायचा डॉक्टरकी; पोलिसांनी आवळली गचांडी
  2. बीएआरसी क्वाटर्समध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, दोन विद्यार्थ्यांना अटक
  3. Raped On Doctor Woman : महिला डॉक्टरवर नराधमाचा बलात्कार; फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले पैसे

Last Updated : Nov 20, 2023, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.