ETV Bharat / state

सेना-भाजप करणार बेस्ट बसचे रूपांतर शौचालयात

शहराची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये फिरते शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. विरोधकांकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी शिवसेना भाजपने सदर प्रस्ताव मंजूर केला आहे.

author img

By

Published : Mar 10, 2019, 7:57 AM IST

बेस्ट बस

मुंबई - शहराची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये फिरते शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. यासाठी पालिका सभागृहात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, विरोधकांकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी शिवसेना भाजपने सदर प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता बेस्टच्या भंगारात निघालेल्या बसमध्ये जागोजागी शौचालये पाहण्यास मिळणार आहेत.

विरोधी पक्ष नेते रवी राजा

मुंबईत मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक मंदावली आहे. याचा त्रास वयोवृद्ध आणि मधुमेह झालेल्यांना सहन करावा लागतो. या कारणाने बेस्टच्या भंगारमधील बसेसचा वापर फिरत्या शौचालयासाठी करावा. अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये सर्व पक्षीय सदस्यांनी विरोध केला होता.

आज याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी आला असता त्याला विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी जोरदार विरोध केला. बेस्ट ही मुंबईचा लौकिक आहे. तिचा वापर शौचालय म्हणून करणे योग्य नाही. पालिका २२ हजार शौचालय उभारणार आहे. त्यामधील शौचालये मेट्रोच्या बाजूने उभारावीत. पालिकेकडे मोबाईल टॉयलेट्स आहेत, त्याचा वापर करावा. मेट्रोलाही शौचालय उभारण्यास सांगावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली. त्यानंतरही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला.

Intro:मुंबई -
मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये फिरते शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकाने केली होती. यासाठी पालिका सभागृहात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. विरोधकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी शिवसेना भाजपाने सदर प्रस्ताव मंजूर केला. यामुळे आता बेस्टच्या भंगारात निघालेल्या बसमध्ये जागोजागी शौचालये पाहण्यास मिळणार आहेत. Body:मुंबईत मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक मंदावली आहे. याचा त्रास वयोवृद्ध आणि मधुमेह झालेल्याना सहन करावा लागतो. याकारणाने बेस्टच्या भंगार बसेसचा वापर फिरत्या शौचालयासाठी करावा अशी मागणी शिवसेेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये सर्व पक्षीय सदस्यांनी विरोध केला होता.

आज याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीसाठी आला असता त्याला विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी जोरदार विरोध केला. बेस्ट ही मुंबईची लौकिक आहे. तिचा वापर शौचालय म्हणून करणे योग्य नाही. पालिका 22 हजार शौचालय उभारणार आहे. त्यामधील शौचालये मेट्रोच्या बाजूने उभारावीत. लागल्यास पालिकेकडे मोबाईल टॉयलेट्स आहेत, त्याचा वापर करावा. मेट्रोलाही शौचालय उभारण्यास सांगावे अशी मागणी रवी राजा यांनी केली. त्यानंतरही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.