मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर पडलेले 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे. 1 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजण्याच्या फक्त 414 तक्रारी शिल्लक असल्याची माहितीही पालिकेने दिली. मात्र, हे खड्डे भरण्यासाठी पालिकेने गेल्या 6 वर्षात 113 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2013-14 या वर्षात एका खड्ड्यावर तब्बल 2 लाख 3 हजार 966 रुपये खर्च झाला असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडे सन 2013 पासून खड्डयांबाबत आलेल्या ऑनलाइन तक्रारी आणि त्यावर केलेला खर्च याबाबत माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2013 पासून 31 जुलै 2019 पालिकेकडे खड्ड्यांच्या 24 हजार 146 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 23 हजार 388 तक्रारींचे निवारण पालिकेने केले.
हेही वाचा - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
2013 ते 2019 या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण 175 कोटी 51 लाख 86 हजार रुपये आर्थिक तरतूद केली होती. त्यातील 113 कोटी 84 लाख 77 हजार हजार रुपये आतापर्यंत खड्डे भरण्यासाठी खर्च झाले आहेत.
हेही वाचा - म्हाडाने नोटीस दिलेली इमारत कोसळली, १७ जणांना सुखरूप बाहेर काढले
मुंबईतील खड्डयांपेक्षा पालिकेने त्यावर केलेल्या खर्चाची आकडेवारी जास्त भयावह आहे. शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईत खड्ड्यांचे साम्राज्य असेल, तर हा पैसा गेला कुठे याची चौकशी करण्याची गरज आहे. पालिकेने या खड्यांबाबतचा तपशील आपल्या संकेत स्थळावर टाकून सार्वजनिक करावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद यांनी केली आहे.
खड्डे भरण्यासाठी केलेला खर्च (वर्षनिहाय) -
१) वर्ष 2013-2014 मध्ये 2268 खड्डे भरण्यासाठी 46 कोटी 25 लाख 97 हजार रूपये खर्च केले आहे. या प्रमाणे एक खड्डा भरण्यासाठी 2 लाख 3 हजार 966 रूपये खर्च झाले.
२) वर्ष 2014-2015 मध्ये 2098 खड्डे भरण्यासाठी 34 कोटी 16 लाख 92 हजार रूपये खर्च केले आहे. या प्रमाणे एक खड्डा भरण्यासाठी 1 लाख 67 हजार 632 रूपये खर्च झाले.
३) वर्ष 2015-2016 मध्ये 1583 खड्डे भरण्यासाठी 10 कोटी 61 लाख 27 हजार रूपये खर्च केले आहे. या प्रमाणे एक खड्डा भरण्यासाठी 67 हजार 41 रूपये खर्च झाले.