ETV Bharat / state

शिवसेनेच्या युवराजांसाठी पालिकेने वरळीमधील खड्डे बुजवले - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीमध्ये रॅली काढली. शिवसेनेच्या युवराजांना खड्ड्यांचा त्रास नको म्हणून ही रॅली ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावरील खड्डे महानगरपालिकेने बुजवले.

खड्डे बुजवताना महानगरपालिकेचे कर्मचारी
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:10 PM IST

Updated : Oct 3, 2019, 11:55 PM IST

मुंबई - पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही हे खड्डे बुजवले जात नाहीत. मात्र, वरळीमधील खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीमध्ये रॅली काढली. शिवसेनेच्या युवराजांना खड्ड्यांचा त्रास नको म्हणून ही रॅली ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावरील खड्डे महानगरपालिकेने बुजवले.

आदित्य ठाकरेंची रॅली ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावरील खड्डे महानगरपालिकेने बुजवले

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. तरीही पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यावर खड्डे पडणे अशा समस्या मुंबईत दरवर्षी निर्माण होतात. पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम होतो. काही वेळा मुंबई ठप्पही होते. मात्र, पालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

हेही वाचा - शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो - आमदार अमित लोडा

आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी त्यांनी आपल्या वरळी येथील कार्यालयापासून निवडणूक अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. या मार्गावर वरळी नाका येथे खड्डे पडलेले होते. आदित्य ठाकरेंची रॅली येण्याअगोदरच हे खड्डे बुजवण्यात आले. यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या सर्वच रस्त्यांवरून रॅली काढली तर, मुंबई खड्डे मुक्त होऊ शकते, अशी खोचक चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

Intro:मुंबई - पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. हे खड्डे बुजवले जात नाहीत. यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. मात्र वरळीमध्ये आज चमत्कार झाला आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी रॅली काढली. शिवसेनेच्या युवराजांना खड्डयांचा त्रास नको म्हणून ही रॅली ज्या मार्गाने जाणार होती त्या मार्गावरील खड्डे महापालिकेने बुजवले.
Body:मुंबई महापालिकेत २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. तरीही पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यावर खड्डे पडणे अशा अनेक समस्या मुंबईत दरवर्षी निर्माण होतात. पाणी तुंबल्याने वाहतूकीवर परिणाम होतो. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. पावसामुळे दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात. पालिका खड्डे बुजवले सांगत असली तरी रस्त्यावर मात्र खड्डे तसेच असतात. या खड्डेमय रस्त्यावरून मुंबईकरांना दरवर्षी ये जा करावी लागते. यावर्षीही खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. पालिकेने खड्डे बुजवल्याचा दावा केला. मात्र आजही मुंबईमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत.

आज या खड्ड्यांचा फटका मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवराज आदित्य ठाकरे यांना बसणार होता. आदित्य ठाकरे यांनी आज वरळी विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी त्यांनी आपल्या वरळी येथील प्रचार कार्यालयापासून निवडणूक अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. ही रॅलीच्या वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरून काढण्यात आली. या मार्गावर वरळी नाका येथे खड्डे पडले होते. आदित्य ठाकरे रॅली येण्या आधीच हे खड्डे बुजवण्यात आले. यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सर्वच रस्त्यावरून रॅली काढल्यास मुंबई खड्डे मुक्त होऊ शकते अशा चर्चा नागरिकांमध्ये होती.

बातमीसाठी vis Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.