ETV Bharat / state

मुंबई : बकरी ईदसाठी पालिकेचे देवनार पशुसंवर्धन गृह सज्ज - शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात

'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुसंवर्धन गृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे(म्हैस, रेडा आदी) येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबई : बकरी ईदसाठी पालिकेचे देवनार पशुसंवर्धन गृह सज्ज
author img

By

Published : Aug 10, 2019, 6:21 PM IST

मुंबई - 'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुसंवर्धन गृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे(म्हैस, रेडा आदी) येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून येणाऱ्या विक्रेत्यांसह छोट्या, शेळ्या, मेंढ्या व मोठी जनावरे देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाली आहेत. पशुसंवर्धन गृह परिसरात आलेल्या विक्रेते, जनावरेन तसेच ग्राहकांसाठी महापालिकेने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. देवनार पशुसंवर्धन गृह परिसरात छोट्या जनावारांची चोरी होण्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या होत्या. ज्याबाबत विक्रेत्यांकडून वेळोवेळी तक्रारी आल्या होत्या. त्याला आळा बसावा यासाठी महापालिका प्रशासनान यावर्षी अधिक काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणार आहे. पास वितरण पद्धतीही आता आणखी सुधारित करण्यात आली आहे. याअंतर्गत व्यापाऱ्यांना देण्यात येणारी ओळखपत्रे यावर्षी प्रथमच 'स्मार्ट कार्ड' स्वरुपात असणार आहेत.

देवनार पशुसंवर्धन गृहात ये-जा करताना या 'बारकोड' असलेल्या 'स्मार्ट कार्ड स्वरुपाच्या प्रवेशपत्रांचे 'स्कॅनींग' केले जाणार आहे. शेळ्या-मेंढ्या विक्रीच्या गेटपासवर देखील बारकोडींग असणार आहे. या बारकोडींगमुळे एखाद्या विक्रेत्याने किती शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आणल्या व त्यापैकी कितींची विक्री झाली, याबाबतची माहिती संगणकाच्या एका 'क्लिक'वर सहजपणे उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

जनावरांच्या माहितीसाठी तीन डिजिटल बोर्ड -
देवनार पशुवधगृहात किती जनावरे आली, किती जनावरे विकली गेली, व सध्या किती जनावरे शिल्लक आहेत याची माहिती इच्छुकांना त्वरित व सहजपणे मिळावी यासाठी देवनार पशुसंवर्धन गृह परिसरातील दर्शनीय ठिकाणी ३ डिजीटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. या डिजिटल बोर्डवरील माहिती दर ४ तासांनी अद्ययावत केली जात आहे.

अशा असणार सुविधा -
पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी १ हजार लीटरच्या १०० टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाड्याजवळ ५ हजार लीटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. छोटी जनावरे ठेवण्यासाठी आणखी ४० हजार चौ.मी. आकाराचे एक नियमित स्वरुपाचे 'शेड' पशुवधगृहाच्या परिसरात आहे. यासोबतच ५० हजार चौ.मी.चे एक अतिरिक्त तात्पुरते 'शेड' देखील उभारण्यात आले आहे. तर मोठ्या जनावरांसाठी २५ हजार चौ. मी. आकाराचे नियमित स्वरुपातील शेड उपलब्ध असणार आहे.

Intro:मुंबई - 'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुवधगृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुवधगृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर साधारणपणे १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे पशुवधगृहात येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.Body:'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून येणा-या विक्रेत्यांसह छोट्या, शेळ्या, मेंढ्या व मोठी जनावरे (म्हैस, रेडा आदी ) देवनार पशुवधगृहात दाखल झाली आहेत. पशुवधगृह परिसरात आलेल्या विक्रेत्यांसाठी व जनावरांसाठी तसेच येणा-या ग्राहकांसाठी महापालिकेने विविध सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवनार पशुवधगृहाच्या परिसरात छोट्या जनावारांची चोरी होण्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या होत्या. ज्याबाबत जनावरांची विक्री करण्या-या विक्रेत्यांकडून वेळोवेळी तक्रारी आल्या होत्या. या बाबींना आळा बसावा यासाठी महापालिका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर व काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी यावर्षी केली आहे. तसेच पास वितरण पद्धतीही आता आणखी सुधारित करण्यात आली आहे. याअंतर्गत व्यापा-यांना देण्यात येणारी ओळखपत्रेही यावर्षी प्रथमच 'स्मार्ट कार्ड' स्वरुपात असणार आहेत. देवनार पशुवधगृहात प्रवेश करते वेळी व बाहेर जाताना या 'बारकोड' असलेल्या 'स्मार्ट कार्ड स्वरुपाच्या प्रवेशपत्रांचे 'स्कॅनींग' केले जाणार आहे. शेळ्या-मेंढ्या विक्रीच्या गेटपासवर देखील बारकोडींग असणार आहे. या बारकोडींगमुळे एखाद्या विक्रेत्याने विक्रीसाठी किती शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आणल्या व त्यापैकी कितींची विक्री झाली, याबाबतची माहिती संगणकाच्या एका 'क्लिक'वर सहजपणे उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

जनावरांच्या माहितीसाठी तीन डिजिटल बोर्ड --
देवनार पशुवधगृहात किती जनावरे आली, किती जनावरे विकली गेली, व सध्या किती जनावरे शिल्लक आहेत याची माहिती इच्छुकांना त्वरित व सहजपणे मिळावी यासाठी देवनार पशुवधगृह परिसरातील दर्शनीय ठिकाणी ३ डिजीटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. या डिजिटल बोर्डवरील माहिती दर ४ तासांनी अद्ययावत केली जात आहे.

अशा असणार सुविधा --
पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी १ हजार लीटरच्या १०० टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाड्याजवळ ५ हजार लीटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. छोटी जनावरे ठेवण्यासाठी आणखी ४० हजार चौ.मी. आकाराचे एक नियमित स्वरुपाचे 'शेड' पशुवधगृहाच्या परिसरात आहे. यासोबतच ५० हजार चौ.मी.चे एक अतिरिक्त तात्पुरते 'शेड' (निवारा वाडे) देखील उभारण्यात आले आहे. तर मोठ्या जनावरांसाठी २५ हजार चौ. मी. आकाराचे नियमित स्वरुपातील  शेड उपलब्ध असणार आहे. सुर्यास्तानंतरच्या प्रकाश व्यवस्थेसाठी परिसरात ५०० वॅटचे ५०० हॅलोजन दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच ४० वॅटचे २ हजार टयुबलाईट देखील परिसरात लावण्यात आलेले आहेत.

१६ टेहळणी मनोरे उपलब्ध --
देवनार पशुवधगृह परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक चोख व्हावी, यासाठी या परिसरात ११ फूट उंचीचे १५ टॉवर्स व २२ फूट उंचीचा एक टॉवर असे एकूण १६ टेहाळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. तसेच परिसरावर सहजपणे लक्ष ठेवणे शक्य व्हावे, यासाठी २०८ सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आजुबाजूच्या १७ ठिकाणी देखील सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हँडमेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी, डोअरमेटल डिटेक्टर इत्यादी अत्याधुनिक उपकरणांसह सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

विक्रीसाठी बारकोड असलेले गेटपास --
या वर्षी प्रथमच शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी 'बार कोड' असलेले गेटपास देण्यात येणार आहेत. बारकोड असणारे हे गेट पास स्कॅन करुन व त्यानुसार खात्री झाल्यानंतरच जनावरांना बाहेर घेऊन जाता येणार आहे. यामुळे जनावरांच्या चोरीला आळा बसण्यासोबतच जनावरांची आवक व जावक नोंद ठेवणे सुलभ होणार आहे.

सोबत vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.