ETV Bharat / state

MegaBlock : मुंबईकरांच्या त्रासात भर.. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सुरू असताना मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

आज मुंबईची जीवनवाहिनी लोकलला काही काळ विश्रांती मिळणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे, हर्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे बाहेर फिरायला जाणार असाल तर वेळेचे योग्य नियोजन करून घराबाहेर पडा.

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक
author img

By

Published : Aug 6, 2023, 10:37 AM IST

मुंबई: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच रेल्वेकडून तीन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जात आहे. हा मेगाब्लॉक दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक केला आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकावर मेगाब्लॉक असणार आहे.

कसा असेल मेगाब्लॉक: माटुंगा-ठाणे अप आणि डीएन स्लो लाईन्स सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 07.42 ते दुपारी 1.02 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकावरुन या गाड्या धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. नियोजित आगमनापेक्षा या गाड्या 15 मिनिटांनी गंतव्य स्थानावर पोहोचतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर लोकल रेल्वे थांबतील.

या मार्गावर असेल ब्लॉक: सकाळी 07.47 ते दुपारी 12.37 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगापासून या गाड्या अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. परंतु नियोजित आगमनापेक्षा या गाड्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. या गाड्या ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबतील. कुर्ला-वाशी अप आणि डीएन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल पर्यंतचा मार्ग सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बंद असेल. या वेळेत एकही लोकल रेल्वे धावणार नाही. त्याचबरोबर सकाळी 10. 16 ते दुपारी 3.47 मिनीटांपर्यंत पनवेल ते सीएसएमटी पर्यंत अप हार्बर मार्गावर रेल्वे धावणार नाही.

तरीही प्रवास करता येणार: ब्लॉक घेतलेल्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेली आहे. तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीपर्यंत मेगाब्लॉक असल्याने त्या मार्गावरील सर्व प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करुनच प्रवास करावा, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वे आणि हर्बर रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे अशा तीन रेल्वे मार्गावरील आज मेगा ब्लॉक आहे. विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक करावा लागतो. यामुळेच आठवड्याचे इतर दिवस रेल्वे सुरळीत नियमितपणे धावत असतात. प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे जो त्रास होतो, त्याबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.- मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख- डॉ. मानसपुरे.

हेही वाचा-

  1. Barauni New Delhi Special Train : चुकीच्या सिग्नमुळे रेल्वेची दिशा चुकली.. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे टळला अपघात
  2. Eenadu Editorial : भारतीय रेल्वेला हवा केवळ नफा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.