ETV Bharat / state

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेवर परिणाम - रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ शिवराज मानसपुरे

Mumbai Local Train : मुंबईमध्ये आज पुन्हा लोकलनं प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय. मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळं विस्कळीत झाली असून कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

Mumbai Local Train
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेवर परिणाम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 12:48 PM IST

मुंबई Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या वांगणी ते बदलापूर या रेल्वेस्थानका दरम्यान सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. ओव्हरहेड वायर खराब झाल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे सेवा तात्पुरत्या थांबल्या आहेत. अप लाईन सेक्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या दिशेनं हा बिघाड झाल्यानं एक्स्प्रेस मेल एका मागे एक उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, यामुळं सर्व एक्सप्रेस गाड्या पनवेल मार्गाने वळवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

मेगा ब्लॉक नसतानाही तांत्रिक बिघाडामुळे ठरला मेगाब्लॉक : आज खरं तर मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता. परंतु वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूच्या मेल एक्सप्रेस आणि लोकल रेल्वे गाड्या आहेत. त्या ठिकाणीच थांबायला लागल्या आहेत.

मेल एक्सप्रेस गाड्या आता व्हाया पनवेल दिशेनं धावणार : छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे म्हणजेच अप लाईनवर बिघाड झाल्यामुळं रेल्वे प्रशासनानं डाऊनलाईन वापरून गाड्यांचे नियोजन केलं. त्यामुळं आता मेल एक्सप्रेस गाड्या व्हाया पनवेल मार्गानं-त्या ठिकाणी जाण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केले. त्यामुळेच मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातदेखील आता काहीसा बदल होणार आहे. अर्धा तास ते एक तास उशिरा नामेल एक्सप्रेस धावतील, अशी शक्यता रेल्वे प्रवासी संघटना अमोल पाटील यांनी व्यक्त केली.

कल्याण ते कर्जत डाऊन मार्ग वापरून गाड्यांची वर्दळ कमी करण्याचा प्रयत्न : एकामागं एक या रीतीनं रेल्वे गाड्या एक्सप्रेस आणि काही लोकल उभ्या असल्यामुळं कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावरून सर्व गाड्या चालवण्यात येत आहेत, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. परंतु एका मार्गावरून गाड्या चालवणं हे तितंक सोपे नाही. तसंच प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळं रेल्वे प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

रेल्वे प्रशासनाची भूमिका काय : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, सकाळी मध्य रेल्वेच्या वांगणी ते बदलापूर अप सेक्शन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. ओव्हर हेड वायर खराब झाली. त्यामुळं तिच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत होईल. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहेत. मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी वाया पनवेल दिशेकडून मार्ग वळवलेला आहे. काही लोकल या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Western Railway Line : पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्ती कामामुळे 200 पेक्षा जास्त लोकल रद्द; रेल्वे प्रवासी संघटनेनं व्यक्त केला संताप
  2. Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो आज रेल्वेचे हे वेळापत्रक पाहा... मध्य आणि हार्बर मार्गावर आहे मेगाब्लॉक
  3. Mumbai local Train Accident: बेलापूर खारकोपर दरम्यान रेल्वेचे तीन डबे घसरले, रेल्वे सेवा ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.