मुंबई - मुंबईकराकंसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू होणार आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मुभा दिली जाणार आहे. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
नुकताच ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, लस घेतल्याची माहिती एका अॅपवर नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासास परवानगी देणारे कार्ड दिले जाणार आहे. लवकरच ते अॅप लाँच केले जाणार आहे. शिवाय, वॉर्ड ऑफिसमधूनही ऑफलाईन पद्धतीने लोकल प्रवासासाठी लागणाऱ्या परवानगीचे कार्ड मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांनाच लोकल प्रवासास मुभा दिली जाणार आहे, असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Pune Unlock : पुणेकरांसाठी खुशखबर! विकेंड लॉकडाऊनही नाही