ETV Bharat / state

मुंबईत 'भारत बंद'चा परिणाम नाही; जनजीवन सुरळीत

author img

By

Published : Jan 8, 2020, 12:39 PM IST

देशभरात विविध कामगार संघटनांनी 8 जानेवारीला बंद पाळण्याचे आवाहन केले. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर मात्र 'भारत बंद'चा फारसा परिणाम झालेला नाही.

बंद
बंद

मुंबई - देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवारी) भारत बंदची हाक दिली. याला विविध ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमध्ये बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी आणि फेरीवाले या मोठ्या संघटना आहेत. मात्र, या संघटना संपात सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक राजधानीवर 'भारत बंद'चा फारसा परिणाम झालेला नाही. बँकांचे कामकाज मात्र, बंद आहे.

मुंबईमध्ये भारत बंदचा परिणाम दिसला नाही

हेही वाचा - LIVE: व्यापारी संघटनांची भारत बंदची हाक, बंगालमध्ये आंदोलकांनी रेल्वे अडवल्या
कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशभरात संप पाळण्याचा निर्णय घेतला. या संपात देशभरातील 269 कामगार संघटना आणि इतर संघटना उतरल्या आहेत. यामुळे मुंबईमधील सार्वजनिक रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शिवसेना प्रणित कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही या बंदला पाठींबा दर्शवल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी होईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात असे घडले नाही.

Intro:मुंबई - कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील बेस्ट, रिक्षा टॅक्सी, पालिका, फेरीवाले यांची शशांक राव यांच्या सर्वात मोठ्या संघटना आहेत. राव यांच्या संघटना संपात सहभागी झाल्या नसल्याने आर्थिक राजधानीत संपाचा म्हणावा तसा परिणाम झालेला नाही. मुंबईत बँकांचे कामकाज मात्र बंद असल्याचे दिसत आहे.Body:कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशभरात आज संपाची हाक दिली आहे. या संपात देशभरातील 269 कामगार व इतर संघटना उतरणार आहेत. यामुळे बँका आणि सरकारी कार्यालयामधील कामे बंद राहणार असून मुंबईमधील सार्वजनिक रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या संपात शिवसेना प्रणित कामगार संघटना तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठींबा दर्शवल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी होईल असे सांगितले जात होते.

मात्र मुंबईत बेस्ट, पालिका, फेरीवाले, रिक्षा टॅक्सीच्या सर्वात मोठ्या संघटना शशांक राव यांच्या ताब्यात आहे. शशांक राव सध्या भाजपाच्या जवळचे असल्याने त्यांनी आपल्या संघटनांनी संपात सहभाग घेऊ नये असे पदाधिकारी आणि सदस्यांना सांगितले आहे. यामुळे मुंबईत रिक्षा, टॅक्सी, बेस्टच्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. तसेच फेरीवालेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आपले धंदे नेहमी प्रमाणे लावून आहेत. रेल्वे कर्मचारी विविध रेल्वे स्थानकांवर काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त करणार आहेत. याकारणाणे रेल्वे सेवाही सुरळीत सू्रु आहे.

बँका बंद -
मुंबईत बस, रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्या तरी बँकांचे कामकाज मात्र बंद आहे. बहुतेक बँकांची शटर बंद ठेवून कामगार संपात उतरले आहेत. काही बँकांमध्ये कर्मचारी असले तरी संप असल्याने कामकाज होत नव्हते.

काय आहेत मागण्या -
- भारत सरकारचे कामगार विरोधी धोरण.
- खासगीकरण पद्धतीने कामे करून घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण.
- नोटबंदी जीएसटीमुळे मोठे उद्योगधंदे बंद त्यामुळे बेकारीची प्रचंड संख्या
- कंत्राटी कामगार कायदा रद्द झाला पाहिजे.
- बेकारी नष्ट करण्यासाठी उद्योग निर्मिती झाली पाहिजे.
- मोदी-शाह यांच्या हुकुमशाही विरोधात.

बातमीसाठी vivo vis आणि p2c Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.