मुंबई Mumbai IIT Students protest : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मुंबईच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी ओपन हाऊस मिळावा यासाठी 24 नोव्हेंबरला मूक निदर्शनं केली आहेत. प्रशासनानं वस्तीगृहातून दुसऱ्या वसतीगृहात जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
ओपन हाऊस मिळावं विद्यार्थ्यांची मागणी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई या ठिकाणी पीएचडीसाठी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशासनानं वस्तीगृह स्थलांतर करण्यास सांगितलंय. एका वस्तीगृहातून दुसऱ्या वस्तीगृहात जावं अशी सूचनाही केलीय. परंतु, पीएचडीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता जवळ आल्यामुळं विद्यार्थ्यांना ओपन हाऊस मिळावं अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. परंतु, प्रशासनानं ही मागणी पूर्ण न केल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यामुळं मूक निदर्शनं केली आहेत.
संशोधन करणाऱ्यांनी एकाच ठिकाणी निवास करण्याची सूचना : आयआयटी मुंबईच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहेत. वस्तीगृहात प्रत्येकाला स्वतंत्र खोल्या दिल्या होत्या. मात्र त्याऐवजी आता सर्वांनी सामायिक कक्षामध्ये निवास करण्याची सूचना आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतु, त्याऐवजी ओपन हाऊस मध्ये जागा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र प्रशासनानं मागणी मान्य न केल्यानं आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मूकनिदर्शनं केली.
स्वतंत्र निवासाचीच सोय द्यावी : आयआयटी पीएचडीच्या मुलींसाठी 10 आणि 11 हे वस्तीगृह कक्ष आहेत, तर मुलांसाठी क्र. 12, 13 ,14 व 18 या ठिकाणी निवासी वस्तीगृह आहेत. परंतु, आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडून अचानकपणे विद्यार्थ्यांना ईमेल प्राप्त झाला. त्यामुळं विद्यार्थी गोंधळले आणि विद्यार्थ्यांनी आहे तीच व्यवस्था करावी नाहीतर ओपन हाऊस या ठिकाणी आमची व्यवस्था करावी अशी मागणी केलीय.
"पीएचडीचे विद्यार्थी सतत संशोधनांमध्ये मग्न असतात. बारा बारा तास संशोधनाच्या विषयाचा ते अभ्यास करत असतात. त्यासाठी विविध पातळीवर त्यांना संशोधन करावा लागतं. यामुळं प्रशासनानं स्वतंत्र वस्तीगृहातील व्यवस्थेऐवजी एकाच ठिकाणी निवासाची व्यवस्था केलीय, त्यामुळं संशोधनात अडथळा अधिक होतो. प्रशासनानं पुर्वीसारखीच स्वतंत्र निवासाची व्यवस्था करावी किंवा ओपन हाऊस पद्धतीनं निवासाची व्यवस्था करावी." - विद्यार्थी
याप्रकरणी आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. एकंदरीतच आयआयटी मुंबईत ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झालाय.
हेही वाचा :