मुंबई : भारताच्या आणि चीनच्या सीमेजवळ ( Indo China border ) भारताच्या हद्दीत थांबू व्हॅलीच्या पुढे गुरुडोंगर लेक आहे आणि हे सपाटीपासून सिलिगुडी पासून 17000 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी जायचे कसे आणि तेही टप्प्याटप्प्याने जायचे कसे. याचे आधी प्रशिक्षण घ्याव लागते. आणि तब्बल 21 दिवस अथक मेहनत आणि परिश्रम केल्यावरच वरच्या अत्यंत टोकाला म्हणजे 17000 फूट उंचीवर भारताच्या सीमारेषेजवळ जिथे इंडियन आर्मी कॅम्प असतो तिथे जाता येते. या ठिकाणी अद्याप वीज निर्मिती केली गेलेली ( Power Generation For Indian Army ) नव्हती. आणि इतक्या जमिनीपासून हजारों फूट उंचीवर वीज तयार करणे हे अद्याप दुर्मिळ बाब म्हणता येईल पण हे साध्य केलेले आहे. आयआयटीच्या प्राध्यापक प्रकाश घोष या संशोधकाने. इतक्या उंचीवर पहिल्यांदाच वीज निर्मितीचा पहिलाच प्रयत्न जाणून घेवू सविस्तरपणे
भारतीय लष्कराला विजेची सोय नव्हती : झाले असे की समुद्रसपाटीपासून 17000 फूट उंचीवर त्या ठिकाणी इंडियन आर्मीच्या लोकांना कोणत्याही पद्धतीने वीज सुरू करण्यासाठी ग्रीड नेता येत नाही. कारण अत्यंत अवघड डोंगराळ अशी स्थिती असल्यामुळे तिथे ते अशक्य आहे. तसेच सुरक्षेचे अनेक मुद्दे देखील आहेत. त्याचबरोबर तिथे सर्व ऊर्जा ही डिझेल द्वारे निर्माण केली जाते. म्हणजे डिझेल पहिले त्यांना वाहून नेले जाते. आणि डिझेलच्या द्वारे जनरेटर सुरू करून वीज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्राच कमी असल्यामुळे डिझेल तिथे नेल्यामुळे डिझेल ही काम करत नाही. आणि डिझेल जास्त जळते आणि डिझेलचा वास सर्वत्र तिथे नांदत असतो. डिझेल ज्या वातावरणात तिथे जाळायचे असते तिथे ऑक्सिजनचे प्रमाणच अत्यंत कमी त्यामुळे कार्बन डायऑक्साइड जास्त निघतो. त्याचा फटका आपल्या सैन्यातील सर्व सैनिकांना बसतो. अगदी खाण्यापिण्यामध्ये सुद्धा डिझेलचाच वास तिथे 24 तास असतो. माणसाला श्वासोच्छवास घेण्यासाठी पण ऑक्सिजन लागतो. इतक्या अफाट उंचीवर सैन्याने पहारा द्यायचा तिथे संघर्ष करायचा की आपल्याला श्वास घेण्यासाठी त्याने संघर्ष करायचा हे अवघड संकट सैनिकांच्या समोर नित्याचे ( Power generation near Indo China border ) आहे. त्यामुळे मोठे संकट तिथल्या इंडियन आर्मीच्या अधिकारी आणि सैन्यातील सैनिकांच्या समोर कायमचे होते. आता ह्या संशोधकाने केलेल्या कामगिरीमुळे ती समस्या कायम सुटली .
इंडियन आर्मीला वीज देण्यासाठीची अथक मेहनत : मुंबई आयटीचे संशोधक प्राध्यापक प्रकाश घोष सायन्स अँड एनर्जी या विषयावर त्यांचा अथक शोधणे अभ्यास सुरू असतो आणि त्यांनी कोरोनाच्या आधी इंडियन आर्मीला 17000 फूट उंचीवर वीज देता येऊ शकते. तीही अत्यंत स्वस्त अशी वीज आपण देऊ शकतो. त्यासाठी प्रयोग करायला हवा हे त्यांनी मनाशी ठाणले. भारतीय सैन्य दलासोबत बैठक आणि चर्चा झाल्या त्यानंतर त्यांनी या प्रकल्प सुरू केला. भारतीय सैन्यदनातले अत्यंत वरिष्ठ अधिकारी अधिकारी जनरल बिपिन कुमार रावत यांच्यासोबत देखील आयआयटीच्या प्राध्यापकांनी या संदर्भात बोलणे केले होते. याठिकाणी जायचे तर खास २१ दिवस रहाव लागत त्याशिवाय जाता येत नाही त्या जागी . विशेष प्रशिक्षण घेतल्या शिवाय इथे जाता येत नाही.
सूर्य असूनही वीज नाही : आय आय टी मुंबईचे संशोधक प्राध्याक प्रकाश घोष यांनी सांगितले,'' 365 दिवसातून 330 दिवस तिथे प्रचंड सूर्यप्रकाश असतो. परंतू समुद्रसपाटीपासून 17000 फूट उंचीवर गेल्यावर ऑक्सिजनची मात्रा कमी असते म्हणून सैन्याने स्वतःला जगण्यासाठी तो आजूबाजूला हवेतला ऑक्सिजन मिळवायचा. मात्र हे संकट निवारण केले. सोलर पॅनल जे एकदाच तिथे वाहून नेले गेले आणि तेही अथक परिश्रमानंतर तिथे चालू केले आणि सूर्या द्वारे तिथे वीज तयार केली. आणि जवळजवळ 250 सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आता पहिल्यांदा वीज उपलब्ध झाली. ज्यामुळे आता डिझेल केवल गाड्यांना वाहण्यासाठीच वापरला जाईल. डिझेलचा वापर कमी होईल. त्याच्यामुळे डिझेलची बचत होईल प्रदूषण कमी होईल. त्याचबरोबर सूर्याच्या ऊर्जेचा वापर करता येईल आणि सैन्याचे कामकाज म्हणजे वेगवेगळी सुरक्षा यंत्रणा वापरण्यासाठी संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधन देखील या उर्जेवर आता त्या ठिकाणी चालायला लागतील. जेणेकरून भारतीय सैन्याच्या पहारा देण्याच्या कामामध्ये जागल्याची भूमिका निभवली जाणार.''
प्रकल्पाला भारत सरकारचे साहाय्य : हा संपूर्ण प्रकल्प भारत सरकारच्या विज्ञान आणि ऊर्जा विभाग यांच्या निधीद्वारे केला जातो आहे आणि याचे संपूर्ण शोध कार्य हे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक प्रकाश घोष यांचा चमू करत आहे.या चमूतील पीएचडी विद्यार्थी श्रीहरी गायकवाड म्हणतात, तिकडे पहिल्यांदा वीज निर्माण केली. कारण हवेत प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याने डिझेल लवकर जळत नाही. त्यावर उपाय म्हणून घोष सरांच्या मार्गदर्शनात हे प्रकल्प आता पूर्ण होत आला आहे. '' या प्रकल्पाला भारत सरकार संरक्षण विभाग तसेच विज्ञान व ऊर्जा मंत्रालय यांचे अर्थ साहाय्य लाभले आहे.
या प्रयोगामुळे साध्य झाले : 50 किलो वॅट प्रणालीद्वारे एसी डीसी हायब्रीड मायक्रो गिडचा विकास केला गेला आणि व्हेनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी या प्रणालीचा उपयोग केला गेला. त्यामुळे भारताच्या लष्कराला दर महिन्याला सरासरी ३६०० किलो वॅट ऊर्जा आता मिळायला लागली. परिणामी आता डिझेल फक्त सैन्यातील चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठीच वापरले जाईल. इतर ठिकाणी आता ऊर्जेचा वापर केल्यामुळे संगणक आणि इतर साधन या उर्जेवर काम करतील. इतक्या उंचीवर सभोवतालचे तापमान 30 डिग्री पेक्षा खाली घसरले तरी आता तिथे ऊर्जापुरवठा सहज होईल. त्यामुळे विजेची उपलब्धता तिथे असेल. आता सैन्य आणि सैन्यातील अधिकारी व्यक्ती सर्वांना तिथे संगणक सुद्धा वापरता येईल आणि चालवता येईल. शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार यात शंका नाही. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक जगांची नावं यात वगळली आहेत.