मुंबई - ज्येष्ठ विचारवंत आंनद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांना १२ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरून आंनद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबधावरून ही अटक केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक अयोग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात १२ फेब्रुवारीपर्यंत आनंद तेलतुंबडे यांना अटक न करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी ११ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.