ETV Bharat / state

पीएमसी बँक प्रकरणी आरबीआयला 16 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - mumbai high court

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयकडून पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांबद्दल प्रतिज्ञापत्र येत्या 16 नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पीएमसी
author img

By

Published : Nov 4, 2019, 3:52 PM IST

मुंबई - तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. ईडीकडूनदेखील यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एचडीआयल कंपनीचे सारंग वाधवा आणि राकेश वाधवा या पिता-पुत्रांना सध्या ईडी कोठडी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे हवालदिल झालेले पीएमसी बँक खातेदार हे वेगवेगळ्या माध्यमातून यासंदर्भात सरकारचे आणि आरबीआयचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.

याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयकडून पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांबद्दल प्रतिज्ञापत्र येत्या 16 नोव्हेंबरपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला काही प्रश्न विचारले आहेत. यामध्ये पीएमसी बँक घोटाळा आरबीआयच्या केव्हा लक्षात आला? पीएमसी बँकेवर घालण्यात आलेले आर्थिक निर्बंध केव्हा उठवण्यात येतील? यासंदर्भात आरबीआयला मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ४ जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून यावर येत्या 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा - मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - शरद पवारांसह मुख्यमंत्रीही आज दिल्लीत, सरकार स्थापनेचा घोळ मिटणार का?

Intro:अडीच हजार कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. ईडी कडूनही यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे .एचडीआयल कंपनीचे सारंग वाधवा व राकेश वाधवा या पिता-पुत्रांना सध्या ईडी कस्टडी देण्यात आलेली आहे . तर दुसरीकडे हवालदिल झालेले पीएमसी बँक खातेदार हे वेगवेगळ्या माध्यमातून यासंदर्भात सरकारच आणि आरबीआयचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.Body:मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती . ज्यामध्ये पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा म्हणून याचिका दाखल करण्यात आलेली होती. यावर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयकडून पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांबद्दल प्रतिज्ञापत्र येत्या 16 नोव्हेंबर पर्यंत दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला काही प्रश्न विचारलेले आहेत. पीएमसी बँक घोटाळा आरबीआयच्या केव्हा लक्षात आला ? पीएमसी बँकेवर घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंध केव्हा उठवण्यात येतील ? यासंदर्भात आरबीआयला मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत चार जनहित याचिका दाखल करण्यात आले असून यांवर सुनावणी येत्या 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

(एड - प्रज्ञा तळेकर , याचिकर्त्यांचे वकील ) Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.