ETV Bharat / state

राज कुंद्राची अटक योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली - mumbai high court on raj kundra application

राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे.

Mumbai High Court Dismisses Raj Kundra's Plea over Challenging his Remand Order in Porn Racket Case
राज कुंद्राची अटक योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली
author img

By

Published : Aug 7, 2021, 11:07 AM IST

Updated : Aug 7, 2021, 2:16 PM IST

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, राज कुंद्राच्या सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील आदेश आज (शनिवारी) सुनावला जाणार नाही. संबंधित न्यायाधीशांच्या अनुपलब्धतेमुळे आज त्यावर सुनावणी होणार नाही.

शर्लिन चोप्राची आठ तास चौकशी -

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तिला सोडण्यात आले. तर गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचीही शक्यता आहे. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचेदेखील काही लिंक लागत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने तिची तब्बल आठ तास चौकशी केली. शर्लिन चोप्रा हिला आर्म्स प्राईमसोबत असणाऱ्या संबंधित संदर्भात विचारण्यात आले. त्याचे नियम व अटी शर्ती काय आहेत? यासंदर्भात विचारण्यात आले. तसेच तुम्ही किती व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्याकडे प्रॉडक्शनचे भागीदार कोण आहेत? याबाबतही शर्लिनला विचारणा करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण -

राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.

  • अशी झाली होती अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रयान थारप याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

  • फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -

राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.

Last Updated : Aug 7, 2021, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.