ETV Bharat / state

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण - aslam shaikh corona positive

पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

mumbai guardian minister aslam shaikh
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख
author img

By

Published : Jul 20, 2020, 9:46 AM IST

Updated : Jul 20, 2020, 10:47 AM IST

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी 'मला अल्पशी लक्षणे जाणवत आहेत. मी विलगिकरणात राहण्याचा निर्णय घेत आहे', असे ट्विट करून ही माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

mumbai guardian minister aslam shaikh tested corona positive
मंत्री अस्लम शेख यांनी केलेले ट्विट.

शेख हे मालवणी या विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. या विभागात तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना शेख यांचा अनेकांशी थेट संबंध आला आहे. त्यामुळे त्यांना लागण झाली असावी, असे शेख यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

शेख यांच्या तब्येतीबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे ट्विट शेख यांनी केले. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना ही चाचणी करून घेण्याची सूचना त्यांनी ट्विटद्वारे केली. तर याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारांनंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 लाखांवर पोहोचली आहे. तर 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jul 20, 2020, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.