ETV Bharat / state

गणपती बाप्पा मोरया..! मुंबईत 38 हजार 260 गणेश मूर्तींचे विसर्जन - मुंबई महानगरपालिका

मुंबईमध्ये गणेश विसर्जन उत्साहात पार पडले. आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजेपर्यंत 38 हजार 260 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक 7,540 तर घरगुती 30, 403 मूर्तींचा समावेश आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Sep 13, 2019, 10:27 AM IST

Updated : Sep 13, 2019, 11:52 AM IST

मुंबई - 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', असा जयघोष करत, ढोल ताशांचा गजरात गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबईत आज (शुक्रवार) 6 वाजेपर्यंत 38 हजार 260 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक 7,627 तर घरगुती 30, 403 मूर्तींचा समावेश आहे.

मुंबईमध्ये 38 हजार 169 गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवस भक्ती भावाने गणरायाची पूजा केली जाते. मुंबईमध्ये काल (गुरुवार) सकाळपासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. दुपारनंतर चौपाट्या, नद्या, कृत्रिम तलावावर गणेश विसर्जनासाठी गर्दी झाली होती.

हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत थायलंडमधून आलेल्या भाविकांचा बाप्पांना निरोप

मुंबई महानगरपालिकेने 69 नैसर्गिक स्थळांवर विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. सोबतच 32 कृत्रिम तलावांचीही निर्मिती करण्यात आली होती. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांचे 40 हजार जवान तैनात होते. या व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाने 300 लाईफगार्ड समुद्र किनारी तैनात केले होते. समुद्र किनारी स्वच्छतेसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी होते. यामुळे मुंबईमध्ये कोणतीही अनुचित घटना न घडता विसर्जन पार पडले.

Intro:मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत..ढोल ताशांचा गजर...गुलालाची उधळण करीत... गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबईत सकाळी 6 वाजेपर्यंत 38 हजार 169 गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात कृत्रिम तलावांमधील 3777 मूर्त्यांचा समावेश आहे.Body:मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने भक्त गणेशाची पूजा करतात. या दरम्यान दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काल गुरुवार सकाळपासूनच सुरुवात झाली. दुपारनंतर चौपाट्या, नद्या, कृत्रिम तलावावर गणेश भक्तांची विसर्जनासाठी गर्दी वाढली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा जयजयकार करत बाप्पाला निरोप दिला जात होता.

मुंबई महानगरपालिकेने 69 नैसर्गिक स्थळांवर सुविधा निर्माण केल्या होत्या. तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी 32 कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले होते. मुंबई अग्निशमन दलाने 300 लाईफगार्ड समुद्र किनारी तैनात केले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांचे 40 हजार जवान तैनात करण्यात आले होते. समुद्र किनारी कचरा जमा होऊ नये म्हणून पालिकेने आपले कर्मचारी तैनात केले होते. यामुळे मुंबईमध्ये कोणताही अनुचित घटना न घडता विसर्जन पार पडले.

38169 मूर्त्यांचे विसर्जन -
मुंबईमध्ये सकाळी 6 वाजेपर्यंत 38169 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक 7540
तर घरगुती 30403 मूर्त्यांचा समावेश आहे. एकूण विसर्जन केलेल्या 38169 मूर्त्यांपैकी कृत्रिम तलावात 3777 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 193, घरगुती 3580 तर 4 गौरींचा समावेश आहे.

गणेश विसर्जनाचे vij किंवा फोटो वापरावा Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.