ETV Bharat / state

AC double Decker Bus: मुंबईत एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू, हेरिटेज टूरचा आनंदही घेता येणार

बेस्ट उपक्रमाची शान म्हणून डबलडेकर बसची ओळख आहे. बेस्टची जुन्या डबल डेकर बसची जागा आजपासून एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसने घेतली आहे. देशातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस आजपासून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर सुरू झाली आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात आणखी इलेक्ट्रिक एसी बस येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

AC double Decker Bus
एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू
author img

By

Published : Feb 21, 2023, 1:49 PM IST

मुंबईत एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू,

मुंबई: शहरात प्रवाशांच्या सेवेत एसी डबल डेकर बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत आली आहे. बेस्टच्या ताफ्यात ४५ डबल डेकर बस आहेत. या बसचे आयुर्मान संपत आले आहे. डबल डेकर बसमध्ये जास्त प्रवासी प्रवास करू शकतात. या बसचा खर्चही कमी असतो. एसी इलेक्ट्रिक बसचा खर्च सध्याच्या डबल डेकर बसच्या तुलनेत कमी असल्याने या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेस्टने आपल्या ताफ्यात ९०० एसी इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक बस नुकतीच मुंबईत दाखल झाली होती. आरटीओकडून परवानगी मिळाल्यावर आजपासून ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

बसमध्ये या सुविधा: ही डबलडेकर बस एसी असून विजेवर चालणारी आहे. सुरुवातीला बॅटरी १ तास चार्ज केल्यावर १५० किलोमीटर बस चालणार आहे. त्यानंतर अर्धा तास बॅटरी चार्ज केली तरी ही बस १५० किलोमिटर धावू शकते. सकाळी चार्ज केलेली बस पुन्हा दुपारी चार्ज करावी लागणार आहे. बसमध्ये एकावेळी ५४ प्रवासी बसू शकतात. बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

काय आहेत बसच्या वेळा आणि तिकीट दर: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.४५ आणि दुपारी ४ वाजता पहिली तसेच शेवटची बस दुपारी १२.२० आणि सायंकाळी ७.४० वाजता सुटेल. त्याच प्रमाणे एनसीपीए येथून पहिली बस सकाळी ९.०२ आणि दुपारी ४.२० वाजता तसेच शेवटची बस दुपारी १२.४० आणि रात्री ८ वाजता सुटेल. या बसचे तिकीट ६ रुपये असणार आहे. तर नव्याने सुरू करण्यात आलेली एसी इलेक्ट्रिक बस सोमवार ते शुक्रवार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर धावणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी हेरिटेज टूर म्हणून ही बस चालवली जाणार आहे. हेरिटेज टूरसाठी वरील डेकवरून प्रवास करण्यासाठी १५० रुपये तर खालील डेक वरून प्रवास करण्यासाठी ७५ रुपये आकारले जाणार आहेत. तसेच बेस्टच्या ताफ्यातील बेस्टच्या मालकीच्या बसेस या १८५४ आहेत. भाडेतत्वावरील बसेस १७९३ असे एकूण ३६२७ बसेस आहेत.

हेही वाचा: BEST Double Decker AC Bus बेस्टची पहिली एसी डबलडेकर बस २१ फेब्रुवारीपासून या मार्गावर धावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.