मुंबई - मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली होती. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रुळावर साचल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊ शकली नव्हती. या एक्स्प्रेसमध्ये तब्बल 700 प्रवासी अडकले होते. त्यानंतर त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारच्या विनंतीनंतर एनडीआरएफसह नौदलाचे आणि हवाईदलाचे चॉपर्सही बचावकार्यात सामिल झाले होते. या बचावकार्यात मुंबई अग्निशमन दलानेही रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेशन राबवून अनेक प्रवाशांची सुटका केली.
![महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-fire-resque-opretion-7205149_27072019154920_2707f_1564222760_120.jpg)
वांगणी दरम्यान उभ्या असलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबई अग्निशमन दलाने, बदलापूर पालिका आयुक्तांच्या आदेशाने प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.
![महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-fire-resque-opretion-7205149_27072019154920_2707f_1564222760_540.jpg)
वायुदलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे 3 वाजल्यापासून वांगणीजवळ अडकलेल्या सगळ्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या सर्व प्रवाशांमध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश होता.
![महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-fire-resque-opretion-7205149_27072019154920_2707f_1564222760_472.jpg)