मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळ घोंगावणार होते. मात्र, मुंबईकडे येणाऱ्या वादळाची गती कमी झाल्याने वादळाचे संकट टळले आहे. मुंबईच्या मरीन लाईन्सला क्वीन्स नेकलेस बोलले जाते. येथून ढगाळ वातावरण, वाऱ्यासह पडणारा पाऊस यामुळे मुंबईच्या समुद्रापलीकडील वाळकेश्वर, मलबार हिलचा परिसर दिसत नव्हता. मात्र, वादळाची गती कमी झाल्याने मुंबईमधील पाऊस बंद झाला आहे. आकाशही मोकळे झाले असून वाळकेश्वर, मलबार हिलचा परिसर स्पष्ट दिसू लागला आहे. वादळाचे संकट नाहीसे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला, पाऊसही थांबला - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनारी धडकले. यावेळी समुद्रामध्ये उंचच्या उंच लाटा उसळत होत्या. मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. ढगाळ वातावरण, वाऱ्यासह पडणारा पाऊस यामुळे मुंबईच्या समुद्रापलीकडील वाळकेश्वर, मलबार हिलचा परिसर दिसत नव्हता. मात्र, आता या वादळाचा धोका टळला असून मुंबईतील पाऊस देखील बंद झाला आहे.
![मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला, पाऊसही थांबला nisarga cyclone effect nisarga cyclone update nisarga cyclone mumbai nisarga cyclone effect on mumbai निसर्ग चक्रीवादळ मुंबई निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम निसर्ग चक्रीवादळ अपडेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7462028-thumbnail-3x2-mum.jpg?imwidth=3840)