ETV Bharat / state

चहापत्तीच्या नावावर अमली पदार्थाची तस्करी, येमेनी नागरिकाला एनसीबीकडून अटक - NCB seizes illegal Khat leaves

NCB seizes illegal Khat leaves : एनसीबीच्या मुंबई विभागानं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड करत एका येमेनी नागरिकाला मुंबईत एकूण 6.949 किलो अवैध खताच्या पानांसह (कॅथा एड्युलिस) अटक केली आहे. केनियामधून आलेल्या दोन पार्सलमधून 2.989 किलो आणि 3.960 किलो खताची पानं जप्त करण्यात आलीत.

NCB seizes 6.9 kgs of illegal Khat leaves
एनसीबीने 6.9 किलो अवैध खातची पानं केली जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 12:14 PM IST

मुंबई NCB seizes illegal Khat leaves : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने भारतात खताच्या पानांच्या (कॅथा एड्युलिस) अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटला यशस्वीरित्या उध्वस्त केलंय. मुंबईत एकूण 6.949 किलो अवैध खताच्या पानांसह एका येमेनी नागरिकाला अटक करण्यात आलीय.

चहा पावडर पाकिटात खताची पानं : मिळालेल्या माहितीनुसार, कुरिअरद्वारे हा माल भारतात पाठवला जातोय. केनियामधून बुक केलेले पार्सल मुंबईत आल्यानंतर एनसीबीनं हेरले. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मुंबईतही फॉरेन पोस्टात पार्सलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी चहा पावडर म्हणून पाठवण्यात आलेली अनेक पाकिटं सापडली. त्या पाकिटात चहा पावडर नसून सुकलेली पानं होती. त्यानंतर यासंदर्भात अधिक तपासणी केली असता ती खताची पानं असल्याचं आढळून आलं. या पानांचं वजन 3.960 किलो आहे. तपासादरम्यान, अशाच प्रकारच्या आणखी एका पार्सलची माहिती मिळाली. ते पार्सल देखील मुंबई फॉरेन पोस्टानं रोखून त्याची अधिक पडताळणी केली. तसंच त्या पार्सलची तपासणी केली असता त्यातही 2.989 किलो पानं आढळंली.

संशयितांवर बारीक नजर : NDPS कायदा 1985 अंतर्गत, कॅथा एड्युलिस (ड्राय चॅट किंवा मीरा लीव्हज ड्राय चॅट एड्युलिस) किंवा सामान्यतः 'खत' म्हणून ओळखली जाणारी पानं भारतात वापरणं बेकायदेशीर आहे. त्यानुसार, गुप्त माहिती गोळा करण्यात आली. ज्यामध्ये मध्यपूर्वेतील आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्क भारतात खत पानांची अवैध आयात करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, येमेनच्या नागरिकांच्या ग्रुपची ओळख पटल्यानंतर गुप्तचरांच्या मदतीनं माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर संशयितांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. दोन्ही पार्सल प्रकरणात आरोपीचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिलीय.

एनसीबीची कारवाई : त्यानंतर मुंबईतील मस्जिद बंदर भागातील एका ठिकाणाहून खताची पार्सल कन्साईनमेंट घेण्यास स्थानिक सहकाऱ्याला सांगितलं गेलं. एनसीबी-मुंबई विभागाद्वारे तत्काळ कारवाई करण्यात आली अन् संबंधित परिसरात कडक पाळत ठेवण्यात आली. 29 नोव्हेंबरला एक व्यक्ती मालाची चौकशी करण्यासाठी आणि त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आली. याची माहिती मिळताच एनसीबीच्या अधिकाऱ्यानं त्याला अडवलं. तेव्हा त्यानं स्वत:ची ओळख गलाल एनएमएए (येमेनी नागरिक) अशी दिली.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime : एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईच्या हॉटेलमधून 15 कोटींचे ड्रग्स जप्त, 2 विदेशी नागरिकांना अटक
  2. ANC Seized Drugs : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच कोटींचं ड्रग्ज जप्त; अँटी नार्कोटिक्स सेलनं नायजेरियन तस्कराला केलं अटक
  3. Drug Seized In Mumbai: अंमली पदार्थ विरोधी पथकाचं 'ऑल आऊट ऑपरेशन' यशस्वी, ८८ लाखांचं ड्रग्ज केलं जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.