मुंबई : मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे व भुसावळ या मध्य रेल्वेच्या पाच विभागांपैकी मुंबई विभागाने फुकट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून (without ticket rail passengers) 238 कोटी 72 लाखाचा (Mumbai division earned Rs 238 crore) गल्ला जमवलेला आहे. गेल्या सहा महिन्यातील व इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात फुकट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीबाबत अनेक मोहिमा चालवल्या त्यामध्ये एकूण 36 लाख 28 हजार केसेसमधून रुपये 238 कोटी72 लाख दंड वसूल केला आहे. हा महसूल विक्रमी आहे. एप्रिल-डिसेंबर 2022-23 मधील भारतीय रेल्वेमध्ये हे फुकट्या प्रवाश्यांकडून जमवलेलेले उत्पन्न सर्वाधिक आहे.
मध्य रेल्वेची मोहिम : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 एप्रिल-डिसेंबर ह्या सहा महिन्यात विनातिकीट/अनधिकृत प्रवासाची 36लाख28 हजार प्रकरणे शोधून काढली ज्यामधून रु. 238 कोटी उत्पन्नाची नोंद झाली आहे. 2021-22 मध्ये याच कालावधीत 146कोटी रुपये प्राप्त झाले होते. भारतीय रेल्वेमधील तिकीट तपासणीमधील 238 कोटी रुपये आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. मध्य रेल्वेचे 238कोटी 72 लाख रुपयांचे उत्पन्न केवळ 9 महिन्यांतील आहे, तर यापूर्वीचे सर्वाधिक, मध्य रेल्वेचे संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 साठी उत्पन्न रु. 214 कोटी होते.
आतापर्यंतची सर्वाधिक दंडात्मक कारवाई : यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेमधील तिकीट तपासणीमधील 238 कोटी रुपये आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. हे उत्पन्न केवळ 9 महिन्यांतील आहे, सर्व अधिकृत रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मध्य रेल्वे विनितिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्सप्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.