ETV Bharat / state

ई टीव्ही भारत विशेष : पुढच्या वर्षी दुप्पट जोशात बाप्पाचे आगमन करू; ढोल ताशा मंडळांचा निर्धार - मुंबई ढोल-ताशा पथक न्यूज

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व गणेश मंडळांनी गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होणार नाही. ढोल-ताशा वाजवता येणार नाही, याचे दुःख आहे. मात्र, पुढील वर्षी दुप्पट जोशात बाप्पांचे आगमन करू, अशी भावना ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केली आहे.

Dhol Tasha Squad
ढोल ताशा पथक
author img

By

Published : Jul 11, 2020, 3:54 PM IST

मुंबई - कोरोना लॉकडाऊन दरम्यान आलेले अनेक सण घरच्याघरी साधेपणाने साजरे करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर्षी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होणार नाही. ढोल-ताशा वाजवता येणार नाही याचे दुःख आहे. मात्र, पुढील वर्षी दुप्पट जोशात बाप्पांचे आगमन करू, अशी भावना ढोल-ताशा पथकांनी व्यक्त केली आहे.

पुढच्या वर्षी दुप्पट जोशात बाप्पाचे आगमन करू

बाप्पाचे आगमन होण्याअगोदर मुंबईत असणाऱ्या उड्डाणपुलांखाली मैदानात ढोल-ताशांचा कडकडाटासह पथकांच्या सराव तालमी चालतात. यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ढोल-ताशा पथकांचे आवाज मुंबईत घुमणार नाहीत. यामुळे पथकातील वादक नाराज आहेत. मात्र, सध्या नागरिकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पथकांनीही गणेश मंडळांना साजेशी भूमिका घेत वादन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ढोल-ताशा पथकांची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यापूर्वीचा विचार केला तर काही ठिकाणी सणासुदीला ढोल-ताशा आणि इतरही काही वाद्ये वाजवली जात होती. मात्र, वेगळ्या प्रकारचे सादरीकरण आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे गणेश मिरवणुकींकडे तरुणाईची गर्दी वाढू लागली. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली यासारख्या ठिकाणी एकामागून एक ढोल-ताशा पथके तयार होऊ लागली. शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव या सणांच्या दिवशी ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते. मुख्य वादनाच्या काही महिने आधीपासूनच या पथकांच्या सरावाला सुरुवात होते.

पथकांचे अर्थकारण -

ढोल-ताशा पथकांना मिरवणुकीत सहभागी करून घेण्याचा खर्चही मोठा असतो. बँड वादकांचे पोट जसे फक्त वादनावर अवलंबून असते, तसे ढोल-ताशा पथकांचे नसते. पथकांना जे मानधन दिले जाते त्यातून पथकाचा खर्च वजा करता उरलेली रक्कम वर्षभर विविध सामजिक कामांसाठी वापरली जाते. साठ हजार ते काही लाख रुपयापर्यंतची सुपारी ही पथके घेतात. मात्र, यावर्षी हे सर्व अर्थकारण बंद असणार आहे. मुंबईत 100 पेक्षा जास्त पथकं आहेत. प्रत्येक पथकात 50 ते 100 वादक असतात. कोरोनामुळे या सर्व वादकांची चांगलीच निराशा झाली आहे.

अनेक सणांची ऑर्डर मिळाली नाही -

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व गणेश मंडळांनी गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूका पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच यंदा गुढीपाडवा, शिवजयंती, महाराष्ट्र दिन या कोणत्याच सणाची ऑर्डर पथकांना मिळाली नाही. मिरवणूक रद्द केल्यामुळे अनेक रसिक आणि वादकांमध्ये खंत आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालनकरून त्यांना सहकार्य करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यंदाच्या वर्षी आम्ही सगळे वादक घरी राहू आणि पुढच्या वर्षी जल्लोषात आणि उत्साहात गणरायाचे आगमन करू असे, शिवस्वराज्य ढोल-ताशा पथकातील वादक अतुल रांजणे यांने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.