मुंबई - जून महिना उजाडला तरी आवश्यक तितका पाऊस पडला नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुढील 26 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईवर मोठे जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे.
पाऊस लांबल्याने आणि गेल्या वर्षी परतीचा पाऊस न पडल्याने धरणांतील जलसाठ्याची पातळी खालावली आहे. सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ 6 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी यावेळेस 14.87 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मुंबईत सध्या 10 टक्के पाणी कपात सुरू आहे. तलाव क्षेत्रात पाऊस न पडल्यास ही कपात आणखी वाढवावी लागेल अशी भीती पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भातसा घरणातून पाणी उचलण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मात्र येत्या काही दिवसात चांगला पाऊस होईल आणि पाण्याचं संकट दूर होईल अशी प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केली.
सध्या तलावांमधील जलसाठा
तानसा - 12 टक्के
वैतरणा - 13 टक्के
भातसा - 0.90 टक्के
विहार - 4.89 टक्के
तुळशी - 24.83 टक्के
मोडक सागर - 37.60 टक्के