ETV Bharat / state

Mumbai Crime : पत्नीसह मेहुणीची छेड काढल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे केले तुकडे - अल्पवयीन मुलाची हत्या

पत्नीसह मेहुणीची छेड काढल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे (Mumbai Crime). शफी शेख ( वय ३२) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Youth killed for molestation)

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 9:15 PM IST

Updated : Aug 30, 2023, 9:54 PM IST

हेमराज रजपूत माहिती देताना

मुंबई : पत्नीसह मेहुणीची छेड काढणाऱ्या सतरा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कायदाय प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये ( Chembur Murder) घडला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरसीएफ पोलिसांनी आरोपी नासीर खान (नाव बदलले आहे) ( वय ३२) याला आज अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं अल्पवयीन मुलाचे डोकं, हात, पाय, धड वेगवेगळं करून एका पिशवीत भरून ठेवलं होतं. (Mumbai Crime)

पत्नीच्या भावाची हत्या : पत्नीची छेड काढणारा मानलेला भाऊच असल्यानं संतापलेल्या पतीनं पत्नीच्या भावाचीच हत्या केली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ घडली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं मृतदेहाचे अनेक तुकडे करून स्वयंपाकघरात ठेवले होते. या प्रकरणी ईटीव्ही भारतशी बोलताना आरसीएफ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले की, आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला अटक : चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणारा 17 वर्षीय अल्पवयीन तरुण आपल्या मानलेल्या बहिणीची नेहमी छेड काढत होता. तेव्हा आरोपी नासीर खाननं त्याला घरी बोलावलं. तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळं आरोपीनं त्यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन घरातच ठेवले. बुधवारी सकाळी आरोपी खाननं याबाबत पत्नीला सांगितलं. त्यामुळं घाबरलेल्या पत्नीनं तातडीनं आरसीएफ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरुद्ध गन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाचे केले तुकडे : आई, वडील नसल्यामुळं आरोपीच्या सासूनं अल्पवयीन मुलाला मानसपुत्र मानलं होतं. तो 8 वर्षांचा असल्यापासून आरोपीची सासू त्यांची काळजी घेत होती. आरोपी हा तक्रारदार महिलेचा जावई आहे. मानसपुत्रच बायकोची छेड काढत असल्यामुळं तो अल्पवयीन मुलावर संतापला होता. त्यामुळं आरोपीनं त्याला घरात बोलावून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचं डोकं, हात, पाय शरीरापासून वेगळं करून बॅगमध्ये ठेवल्याचं आरोपीनं पोलीस तपासात सांगितलं. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपीला कलम 302, 342, 201, 37 (1) (अ) 37 (1) (अ) अन्वये अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Molestation Case : रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेचा विनयभंग, आरोपीनं काढला पळ
  2. Fake Passport : बनावट पासपोर्ट वापरून भारतवारी करणाऱ्या नागरिकाला अटक
  3. Angadia Extortion Case : मध्यप्रदेशातील खुनाच्या आरोपीनं मुंबईतील अंगडियांना लावला 6 कोटींचा चुना, न्यायालयानं ठोठावली कोठडी

Last Updated : Aug 30, 2023, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.