ETV Bharat / state

क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा आढळला मृतदेह; डॉक्टर विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल - बलात्काराचा गुन्हा

Mumbai Crime News : मुंबईच्या मालाडमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. याप्रकरणी संबंधित डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Mumbai Crime News
Mumbai Crime News
author img

By PTI

Published : Jan 5, 2024, 11:16 AM IST

Updated : Jan 5, 2024, 2:59 PM IST

मुंबई Mumbai Crime News : मालाडमधील क्लिनिकमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टर विरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दवाखान्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय.

दवाखान्यात मृतावस्थेत आढळली मुलगी : याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी 28 डिसेंबर रोजी क्लिनिकमध्ये मृत अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलीस ठाण्याचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळावर दाखल होताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवल्याचं अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

डॉक्टरविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल : मृत अल्पवयीन मुलीच्या आईनं सांगितलं की, "तिच्या मुलीनं आत्महत्या केली नाही. तिच्या मुलीनं या डॉक्टरच्या असभ्य वर्तनाबद्दल तक्रार केली होती" असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी डॉक्टर विरुद्ध आयपीसी कलम 306, 376 आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलंय.

"कुरार पोलीस ठाण्यात डॉक्टर विरोधात पोस्को कायदा आणि भारतीय दंड संविधान कलम 306 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली नाही." - शशिकांत जगदाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे

17 वर्षीय मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार : दुसऱ्या एका घटनेत 17 वर्षीय मुलानं त्याच वयाच्या त्याच्या मैत्रीणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यानं दिलीय. या मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आल्याचं रबाळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय. हे दोघंही विद्यार्थी असून पीडित मुलगी मुंबईतील रुग्णालयात आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला सांगितलंय. ऑगस्टमध्ये त्याच्या राहत्या घरी 17 वर्षीय मुलानं पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यामुळं ती गरोदर राहिल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलंय. यातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचंही अधिकारी म्हणाला आहे.

हेही वाचा :

  1. माणुसकीचा अंत! अल्पवयीन मुलीवर 13 जणांचा सामूहिक बलात्कार
  2. पोटच्या मुलीवर अत्याचार करुन केलं गरोदर; साई संस्थानच्या सुरक्षा गार्डच्या सतर्कतेनं फरार बाप अटकेत
  3. कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा

Last Updated : Jan 5, 2024, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.