ETV Bharat / state

Mumbai Crime News: मुंबई शहर अमली पदार्थ तस्करांच्या विळख्यात?; दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 2 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 7:20 AM IST

Updated : Oct 16, 2023, 12:41 PM IST

Mumbai Crime News : सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण उघडकीला येत आहेत. ड्रग्ज प्रकरणासंबंधित मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, असं असतानाच आता पुन्हा एकदा मुंबई क्राईम ब्रँचकडून दोन ठिकाणी कारवाईत करण्यात आली. तसंच या कारवाईत 2 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

Mumbai Crime News
मुंबई पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 2 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त केले

मुंबई Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेनं एक किलो एमडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक केली असून, ड्रग्जची किंमत एक कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे जुहू चर्च रोड या परिसरातून वांद्रे अमली पदार्थ विरोधी पथकानं उच्च प्रतीचा 'हायड्रो गांजा' आणि 'चरस' या अमली पदार्थांची तस्करी करुन व्यवसाय करणाऱ्या ४ गुन्हेगारांस अटक केली. कारवाईत एकूण १ कोटी १८ लाख किमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला.

42 वर्षीय व्यक्तीकडून एक किलो एमडी ड्रग्ज जप्त : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने शनिवारी कासिम मोहम्मद शिवानी (वय 42) नावाच्या व्यक्तीला एमडी ड्रग्जसह अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनिट 3 चे अधिकारी गस्त घालत असताना लोअर परळ (पूर्व) च्या लोढा पार्किंगजवळ पोहोचले. तेव्हा त्यांना एक संशयित व्यक्ती तिथं उभा राहून कोणाची तरी वाट पाहत असल्याचं दिसलं. ती व्यक्ती संशयास्पद असल्यानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडं जाऊन चौकशी केली. मात्र त्यानं योग्य उत्तर दिलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो एमडी ड्रग्ज आढळून झाले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला बुधवारपर्यंत (19 ऑक्टोबर ) पोलीस कोठडीत पाठवले आहे. याविषयी अधिक माहिती देत एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंं की, कासिम हा मोहम्मद अली रोड येथील रहिवासी असून तो घड्याळ दुरुस्तीचं काम करतो. या अगोदरही कासिमवर एनडीपीएस कायद्यान्वये अमली पदार्थ विरोधी सेल वरळी युनिट आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

1 कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त : सांताक्रूझ आणि जुहू परिसरात गस्त घालत असताना ४ व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यांच्याकडून 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा आणि २५० ग्रॅम वजनाची 'हायड्रो गांजा' पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध ८(क) सह २० (क), २०(अ) २९ एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान, अटक आरोपी हे ट्रम्पेट स्काय लाउंज बॉम्बे/शिक्षा स्काय लाउंज वा डिस्को डेथ हॉटेल्सच्या मागे असलेल्या पटेलवाडी परिसरातून उच्च प्रतीचे 'हायड्रो गांजा' व 'चरस' या अंमली पदार्थाची तस्करी करत. दरम्यान, आरोपींसोबत आणखी कोणी साथीदार आणि त्यांची एखादी टोळी आहे का? याबाबत सविस्तर तपास अमली पदार्थ विरोधी विभागाचं वांद्रे युनिट करत आहे.

हेही वाचा -

  1. Nashik Drug Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नाशिकमधील फॅक्टरीतून ३०० कोटींचं ड्रग्ज जप्त
  2. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  3. Morshi Murder Case : मोर्शी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, सलाईनमधून दिलं आई आणि लहान भावाला 'प्रतिबंधित औषध', कारण...

Last Updated : Oct 16, 2023, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.