मुंबई Mumbai Crime News : एक 28 वर्षीय तरुण गुगलवर आत्महत्या करण्याचा मार्ग (suicidal thoughts) शोधत होता. त्याची माहिती इंटरपोलला लागली. त्यानंतर इंटरपोलच्या इशाऱ्यानंतर त्याला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. इंटरपोलने सामायिक केलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी (Mumbai Police) त्याचं लोकेशन ट्रेस केलं. त्यानंतर मूळच्या राजस्थानमधील या व्यक्तीला मंगळवारी उपनगरी मालवणीत आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय संस्था : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना ही 'इंटरपोल' म्हणून ओळखली जाते. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील पोलीस सहकार्य करुन गुन्हे नियंत्रणासाठी कार्य करते. मंगळवार दुपारी इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने बचाव कार्य केलं, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
ऑनलाइन शोधला आत्महत्या करण्याचा मार्ग : पीडित तरूण मालाड पश्चिमेतील मालवणी येथील रहिवासी आहे. हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. तपासात पोलिसांना असे आढळून आले की, गेल्या सहा महिन्यांपासून तो बेकार होता. तसंच त्याच्या आईची तुरुंगातून सुटका होऊ न शकल्याने तो नैराश्यात होता. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. त्यासाठी त्याने आत्महत्या करण्याचा ऑनलाइन मार्ग शोधण्यास सुरूवात केली. त्याने गुगलवर अनेकवेळा 'सुसाइड वे' शोधले. यावेळी इंटरपोलच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्याच्या मोबाइल फोन नंबरसह मुंबई पोलिसांना याबद्दल ईमेल पाठवला.
पीडितेला घेतले ताब्यात : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या तरुणाला ताब्यात घेऊन समुपदेशन करण्यात आलं. त्याचे व्यावसायिक समुपदेशकांनी समुपदेशन केल्यानंतर त्याला शहरातील नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आलं.
हेही वाचा -