मुंबई Mumbai Crime News : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेला आरोपी कॉक्स अॅन्ड किंग्सचा प्रमोटर अजय अजित पीटर केरकर बॉम्बे रुग्णालयात मोबाईल आणि टॅबचा वापर करत असल्याचं उघडकीस आलंय. याप्रकरणी आर्थर रोड तुरुंग प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घटलं : आरोपी केरकरला मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने 2020 मध्ये अटक केली होती. अटकेनंतर आर्थर रोड कारागृहात असताना न्यायालयीन आदेशावरून केरकरला उपचारसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून केरकरवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एलए पोलीस दलाचे दोन पोलीस अजय केरकरच्या सुरक्षेसाठी बॉम्बे रुग्णालयात असताना तो मोबाईल आणि टॅब वापरत असल्याचं आर्थर रोड कारागृह प्रशासनाच्या अचानक टाकलेल्या छाप्यामध्ये उघडकीस आलं. त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
यासर्व प्रकरणाला पोलीस जबाबदार? : काही दिवसांपूर्वी पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यानंतर आता मुंबईतील हे प्रकरण उघडकीस आलंय. मात्र,रुग्णालयातील आरोपींपर्यंत मोबाईल कसा पोहोचतोय हा प्रश्न आता निर्माण होतोय. त्यामुळं यासर्व प्रकरणाला पोलीस जबाबदार असल्याचं बोललं जातंय. तसंच पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, ललित पाटील प्रकणात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण या प्रकरणात आता काय होणार? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?
- Lalit Patil Case Update : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिकच्या सराफा व्यापाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक
- Lalit Patil Case Update : ड्रग्ज प्रकरणात आरोपी ललित पाटीलसह अन्य दोघांना 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी