ETV Bharat / state

Mumbai Crime: मुंबईत किरकोळ वाद ठरतायेत जीवघेणा; एक वर्षात खुनाचे 133 गुन्हे दाखल - Mohalla Committee members

बोरिवली येथील एक्सर गावात दोन शेजारी असलेल्या कुटुंबात नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला. अशा किरकोळ कारणावरुन मुंबईत133 खुणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबईत किरकोळ वाद ठरतायेत जीवघेणे
मुंबईत किरकोळ वाद ठरतायेत जीवघेणे
author img

By

Published : Apr 14, 2023, 6:34 AM IST

एक वर्षात खुनाचे 133 गुन्हे दाखल

मुंबई: शहरात अंगावर पाणी उडाले, धक्का लागला, रागाने बघितले, नळावर पाणी भरण्यावरून, ट्रेनमधील सीटवरून, वाहन बाजूल घेण्यास सांगितले यासारख्या किरकोळ वादातून मारहाणीसह जिवघेण्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतच हत्येच्या २० घटना, हत्येचा प्रयत्न केलेल्या ४२ तर दुखापतीच्या ७१६ घटनांची नोंद पोलिसात झाली आहे. या किरकोळ वादातून होणारी भांडणे सोडविताना पोलिसांवरही हल्ला होणाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे, पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.

चेंडू घेण्यास हटकले म्हणून हत्या : धारावीतील विजयनगर इमारतीजवळ असलेल्या मोहम्मद जाहीद (वय ३२) हे जवळील उद्यानात सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे. एचबी शिवदासानी गार्डनमध्ये आरोपी हे खेळत असताना त्यांचा चेंडू पत्र्यावर अडकल्याने तो काढण्यासाठी एक मुलगा चढला. यावेळी जाहीद यांनी त्यांना हटकले. यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राग मनात धरून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान दुखापतीच्या ७१६ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ५६० घटनांची पोलिसांकडून उकल करण्यात आली. गेल्यावर्षी हीच संख्या ६०८ होती तर दुखापतीच्या ५१२ गुन्हे उघड करण्यात आले होते.

इतके हत्येचे गुन्हे उघड: 2020 मध्ये 148 हत्या झाल्या असून त्यापैकी 141 खुणाचे गुन्हे उघड झाले आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये संपूर्ण मुंबईत एकूण 162 खुणाच्या गुणांची नोंद झाली असून त्यापैकी 160 खुणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे 349 हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 340 गुन्ह्यांचे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2022 मध्ये मुंबईत 133 खुणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 129 हत्येचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले, तर 244 हत्येचा प्रयत्न असल्याचे गुन्हे दाखल तर त्यापैकी 239 गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून प्रयत्न : बोरिवली येथील एक्सर गावात दोन शेजारी असलेल्या कुटुंबात नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या मदतीने दोन्ही कुटुंबांची समजूत घातली. अशाचप्रकारे अन्य ठिकाणी समजूत काढून दोन गटांतील वाद मिटविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ग्रँड रोड येथील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या पार्वती मेन्शन इमारतीत दुसरा मजल्यावर रक्तरंजित प्रकार घडला होता. चेतन गाला या व्यक्तीने पत्नी घर सोडून गेल्याच्या रागातून वयोवृद्ध मिस्त्री दाम्पत्याची चाकूने भोसकून हत्या केली. त्यातच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका महिलेला आणि तिच्या मुलीला देखील गालाने चाकूने भोसकले. यात निष्पाप 18 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

हेही वाचा:Mumbai Acid attack Case अनैतिक संबंधांच्या संशयातून ६९ वर्षीय पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.