ETV Bharat / state

Mumbai Crime News : मुंबईत अमली पदार्थाची तस्करी; 505 ग्रॅम चरससह यूपी बिहारमधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या - बिहारमधील लकड़ी नबीगंज ओपी

Mumbai Crime News : एमएचबी कॉलनी पोलिसांनी कारवाई करत 2 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. तसंच त्यांच्या ताब्यातून 8 लाख रुपये किमतीचे 505 ग्रॅम चरस जप्त केलं आहे.

MHB Police arrested 2 accused with 505 grams of Charas drugs
505 ग्रॅम चरससह एमएचबी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 10:24 AM IST

मुंबई Mumbai Crime News : मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी 2 बिहारच्या ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 8 लाख रुपये किमतीचं 505 ग्रॅम चरस जप्त केलं आहे. दीपक अक्षयबरनाथ सिंह आणि असगर अली अमीन हुसैन अंसारी, असं अटक करण्यात आरोपींची नावं आहेत. दरम्यान, या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

505 ग्रॅम चरससह एमएचबी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली

दोन बिहारी तस्करांच्या आवळल्या मुसक्या : एक्सर मेट्रो स्टेशनजवळ एक आरोपी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना आपल्या सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर दीपक अक्षयबरनाथ सिंह नामक ड्रग्ज तस्कराला एमएचबी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी आरोपीकडून 8 लाख रुपये किमतीचे 505 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणी दीपक सिंहची कसून चौकशी करण्यात आली असता, त्यानं असगर अली अमीन हुसैन अंसारी या ड्रग्ज तस्कराची माहिती पोलिसांना दिली. तसंच बिहार इथून असगर अलीकडून आतापर्यंत तीन-चार वेळेस अर्धा-अर्धा किलो चरस आणल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानंतर असगर अली अमीन हुसैन अंसारी याला बिहारमधील लकड़ी नबीगंज ओपी इथून अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू : यासंदर्भात अधिक माहिती देत एमएचबी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुंडाळकर म्हणाले की, एमएचबी पोलीस स्टेशनला एक्सर मेट्रो स्टेशनजवळ एक आरोपी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 8 लाख रुपये किमतीचं चरस जप्त करण्यात आलं. तपासादरम्यान आरोपीनं हे चरस बिहारमधून आणल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी असगरअली अमिन हुसैन याला बिहार इथून अटक केली. तसंच एमएचबी पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Charas Smuggling : अडीज कोटींच्या चरससह मुंबईतून ड्रग्ज पेडलरला अटक
  2. Mumbai crime news : ईडीनं अटक केलेल्या आरोपीचा प्रताप; बॉम्बे रुग्णालयात वापरला मोबाईलसह टॅब
  3. Mumbai Crime News : स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा निर्जनस्थळी विनयभंग, नराधमाला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.